माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अम्ब अंदौरा रेल्वे स्थानक येथील फूटओवर पुलाचे काम लवकरच सुरु होणार
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विनंतीवरून रेल्वेने दिले बांधकामाचे आदेश
Posted On:
28 JUN 2022 11:37AM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी अम्ब अंदौरा रेल्वे स्थानक येथील फूटओवर पुलाच्या बांधकामाचे आदेश दिले आहेत. हा पूल रेल्वे स्थानकाला जामा मशिदीशी जोडेल आणि त्यामुळे रेल्वे स्थानकापासून मशिदीपर्यंतचा प्रवेश सुलभ होईल. या बांधकामाची निविदा खुली झाली असून या कामाची पूर्वतयारी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या उड्डाण पुलासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना 1 जून 2022 रोजी केलेल्या विनंतीनंतर हा आदेश जारी करण्यात आला.
***
S.Thakur/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837519)
Visitor Counter : 137