सहकार मंत्रालय

“शहरी सहकारी पतक्षेत्राची भविष्यातील भूमिका” या विषयावर उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या शेड्युल्ड आणि बहु-राज्य नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित


ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी” (सहकारातून समृद्धी) या संकल्पनेला अधिक बळकटी देणारी ठरेल

शेड्युल्ड आणि बहु-राज्यीय नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्याशी संबंधित विविध मुद्यांवर परिषदेत चर्चा केली जाईल आणि 100 वर्षे पूर्ण केलेल्या नागरी सहकारी बँकांचा सत्कारही केला जाईल

Posted On: 22 JUN 2022 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जून 2022

 

शहरी सहकारी पतक्षेत्राची भविष्यातील भूमिका या विषयावर उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या शेड्युल्ड आणि बहु-राज्य नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी (सहकारातून समृद्धी) या संकल्पनेला अधिक बळकटी देणारी ठरेल.

या परिषदेत होणाऱ्या व्यावसायिक सत्रांमध्ये, शेड्युल्ड आणि बहु राज्य नागरी सहकारी संस्था आणि पतसंस्थांशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल. नागरी सहकारी बँकांची भविष्यातील भूमिका आणि भारतीय रिझर्व्ह बँकेतील (RBI's) तज्ज्ञ  समितीच्या शिफारशी, राष्ट्रीय सहकारी वित्त आणि विकास सहकार्य ही नागरी सहकारी क्षेत्रासाठी  काम करणाऱ्या संस्थेची भूमिका, बँकिंग नियमन (सुधारणा) कायदा, 2020 आणि त्याचे परिणाम, वित्तीय क्षेत्रात बहु-राज्य पतसंस्थांची भूमिका  आणि  सहकारी पतसंस्थांचे नियमन आणि कर आकारणी या संबधीच्या मुद्द्य्नाचा समावेश चर्चांमध्ये असेल.

तसेच 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरी सहकारी बँकांचा या परिषदेत सत्कारही करण्यात येणार आहे.देशात अशा 197 बँका आहेत.  यावरून देशातील सहकार आणि सहकारी बँकांची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत,याची प्रचिती येते. मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या सत्कारासाठी अनेक बँकांचे प्रतिनिधी  या परिषदेला  उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

नागरी सहकारी बँका या देशातील सर्वात जुन्या बँकिंग संस्थांपैकी एक आहेत.त्या एका शतकाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत.  समाजातल्या विविध समुदायांशी संबंधित व्यक्तींकडून या  बॅंका सुरू करण्यात आल्या असून त्यांच्याकडून त्याचे व्यवस्थापन केले जाते,ज्यात शिक्षक, वकील, व्यापारी, डॉक्टर, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर क्षेत्रांचा समावेश असून आपल्या  सदस्यांना त्या बँकिंग सेवा प्रदान करत आहेत.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला उपस्थित राहतील.  

 

 

 

 

S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836222) Visitor Counter : 181