अर्थ मंत्रालय
नवी दिल्ली इथे भारत-जपान यांच्यात वित्तसंवादाचे आयोजन
Posted On:
16 JUN 2022 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2022
जपानचे आंतरराष्ट्रीय व्यवहार, वित्त उपमंत्री मासातो कांडा आणि वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांनी आज इथे पहिल्या भारत-जपान वित्तसंवादात सहभाग घेतला.
भारत-जपान संबंधांचे अलिकडच्या काळातील वाढते महत्त्व लक्षात घेता, उपमहासंचालकांच्या स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या संवादाचा स्तर वाढवून उपमंत्री/सचिवांच्या स्तरावर करण्यात आला.
जपानी शिष्टमंडळात वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा संस्था आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारताच्या बाजूने, वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, भारतीय प्रतिभूती आणि विनियमन मंडळ आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला.
उभय देशांमधील समग्र वित्तीय परिस्थिती, वित्तीय व्यवस्था, वित्तीय डिजिटलायझेशन आणि गुंतवणुकीचे वातावरण यावर सहभागींनी आपापल्या मतांची देवाणघेवाण केली. पुढच्या वर्षी जी20 आणि जी7 चे अध्यक्षपद भूषवताना दोन्ही देश एकत्र काम करत राहतील यावर सहमती दर्शवली. खाजगी वित्तीय संस्थांसह सहभागींनी भारतातील गुंतवणुकीचा आणखी विस्तार करण्यासाठी विविध वित्तीय नियमन मुद्यांवरही चर्चा केली.
उभय देशांनी वित्तीय सहकार्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याकरता चर्चा सुरू ठेवण्यास तसेच टोकियोमध्ये संवादाची पुढील फेरी आयोजित करण्यावर सहमती दर्शवली.
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834575)
Visitor Counter : 171