दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

"सेवा कालावधी पूर्ण केलेल्या 'अग्निवीरांना ' सामावून घेण्याबाबत उपाययोजनांवर दूरसंचार विभागाचे विचारमंथन"

Posted On: 15 JUN 2022 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2022

 

'अग्निपथ योजने' अंतर्गत सशस्त्र दलांद्वारे 'अग्निवीर'ना 4 वर्षांसाठी भरती करण्याच्या  सरकारच्या क्रांतिकारी  घोषणेनंतर, दूरसंचार विभागाने (DoT) सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांसह आज  (15.6.2022) एक बैठक घेतली.  सशस्त्र दलातल्या  4 वर्षांच्या सेवेनंतर बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षित 'अग्निवीरांच्या ' गुणवत्ता , शिस्त आणि प्राप्त कौशल्यांचा  दूरसंचार क्षेत्र आणि विशेषत: सेवा प्रदाते कशा प्रकारे उपयोग करून घेऊ  शकतात यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. चारही टीएसपीचे प्रतिनिधी (Airtel, BSNL, Reliance Jio आणि Vodafone-Idea) तसेच दूरसंचार विभागाचे  वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. संचार भवन येथे  सदस्य (तंत्रज्ञान) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

चर्चेदरम्यान, ‘अग्निवीर’ ना सेवेत सामावून घेण्यासाठी काही क्षेत्रांबाबत चर्चा झाली. यामध्ये ऑप्टिकल फायबर देखभाल , वातानुकूलन  उपकरणे, पायाभूत सुविधांची तरतूद विशेषत: शेवटच्या मैलांपर्यंत संपर्क व्यवस्था, फायबर टू होम (FTTH) आणि ग्राहक इंटरफेस क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेमुळे उपलब्ध होणारे प्रशिक्षित/कुशल आणि शिस्तबद्ध युवा मनुष्यबळ दूरसंचार क्षेत्रासह देशासाठी एक संपत्ती ठरू शकते यावर सेवा प्रदात्यांमध्ये सहमती झाली. त्यांना हव्या असलेल्या विशिष्ट कौशल्य संबंधी सूचना लवकरच कळवण्यात येतील.  या 'अग्निवीरांना' सशस्त्र दलातील त्यांच्या कार्यकाळात काही विशिष्ट बाबी /क्षेत्रांचे प्रशिक्षण देता येईल का, जेणेकरून  अग्निपथ सेवा पूर्ण करतील तेव्हा ते उद्योगासाठी तयार असतील याचीही चाचपणी केली जाईल.

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834346) Visitor Counter : 175