आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.76 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 3.49 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 36,267

गेल्या 24 तासात 7,584 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.70%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.50%

Posted On: 10 JUN 2022 9:46AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.76 कोटींहून अधिक (1,94,76,42,992) मात्रांचा टप्पा पार केला. 2,49,36,054 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.49 कोटींहून अधिक (3,49,17,732) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,512

2nd Dose

1,00,46,444

Precaution Dose

53,64,614

FLWs

1st Dose

1,84,20,289

2nd Dose

1,75,94,513

Precaution Dose

90,96,477

Age Group 12-14 years

1st Dose

3,49,17,732

2nd Dose

1,88,71,349

Age Group 15-18 years

1st Dose

5,97,72,453

2nd Dose

4,67,26,172

Age Group 18-44 years

1st Dose

55,74,97,921

2nd Dose

49,36,35,305

Precaution Dose

13,40,312

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,08,961

2nd Dose

19,16,44,537

Precaution Dose

17,11,553

Over 60 years

1st Dose

12,71,38,362

2nd Dose

11,95,79,805

Precaution Dose

2,05,68,681

Precaution Dose

3,80,81,637

Total

1,94,76,42,992

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 36,267 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.08% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.70%. इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,791 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,44,092 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 7,584 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,35,050 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.41 कोटींहून अधिक (85,41,98,288) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.50% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% नोंदविण्यात आला आहे.

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832840) Visitor Counter : 133