अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांच्या गव्हर्नरांच्या दुसऱ्या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित

Posted On: 06 JUN 2022 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2022

 

चीनच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या दुसऱ्या बैठकी मध्ये केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने सहभागी झाल्या.वर्ष 2022 साठीच्या ब्रिक्स आर्थिक सहकार्यविषयक कार्यक्रमाबाबत चर्चा करणे हा या बैठकीच्या आयोजनामागील उद्देश होता. या बैठकींमध्ये ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांचे गव्हर्नर यांचे संयुक्त निवेदन, पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, नव्या विकास बँका आणि ब्रिक्स देशांचे अर्थविषयक विचारमंथनाचे जाळे या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा याचा यात समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की ब्रिक्स संघटनेने शाश्वत आणि समावेशक विकासाच्या प्रवासाचा मार्ग नव्याने आखण्यासाठी चर्चेत सहभागी होता यावे तसेच अनुभव, चिंता आणि संकल्पना यांचे आदानप्रदान सोपेपणाने व्हावे यासाठीचा मंच म्हणून यापुढेही कार्यरत राहावे असे त्या म्हणाल्या.

भारताच्या विकासविषयक दृष्टीकोनाविषयी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, भारताच्या आर्थिक विकासाला वित्तीय व्यय तसेच गुंतवणूकविषयक पाठबळ यापुढेही मिळत राहील. आणि मोठ्या पातळीवरील विकासाला,सूक्ष्म पातळीवरील सर्व समावेशक कल्याणाची मिळालेली जोड या कल्पनेवर आधारित अर्थव्यवस्थेला यातून गती प्राप्त होईल.

 ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि या देशांतील प्रमुख बँकांचे गव्हर्नर यांनी यावेळी पायाभूत सुविधाविषयक गुंतवणूक, नवीन विकास बँक, ब्रिक्स देशांच्या आकस्मिक निधीची सोय इत्यादी ब्रिक्स संबंधित आर्थिक मुद्यांवर देखील चर्चा केली.

 

 

 

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831651) Visitor Counter : 184