दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची निवडणूक लढविणार


रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी भारताकडून एम.रेवती यांच्या नावाचा प्रस्ताव सादर

Posted On: 04 JUN 2022 12:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून, भारताने विकास तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी डब्ल्यूएसआयएस 2022 अर्थात या वर्षीच्या जागतिक माहिती संघटनेच्या शिखर परिषदेत सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे 31 मे ते 3 जून 2022 या कालावधीत पार पडलेल्या या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देवुसिंह चौहान यांनी केले.

आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, युनेस्को अर्थात वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रांचा विकासविषयक कार्यक्रम तसेच यूएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद यांच्या सर्व डब्ल्यूइआयएस कृती वाहिनीचे सह-सुविधाकार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संघटनांसोबत दृढ सहकारी संबंध प्रस्थापित करून संयुक्त विद्यमाने या डब्ल्यूएसआयएस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

भारत आयटीयू मंडळाच्या 2023 ते 2026 या कालावधीतील परिचालनासाठी पुन्हा निवडणूक लढवत आहे. भारत 1869 पासून या मंडळाचा सदस्य आहे आणि तेव्हापासून मंडळाचे कार्य, संघाचे उपक्रम यामध्ये अखंडितपणे भाग घेत असून जागतिक समुदायाच्या हितासाठी दूरसंचार तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभागाच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी शक्य तितक्या अधिक प्रमाणात योगदान देत आहे.

आरआरबी अर्थात रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठीचा उमेदवार आणि आयटीयू मंडळाच्या सदस्यत्वासाठी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की संपूर्ण विश्वाला एक संपर्कात असलेला समाज म्हणून स्थापित करण्यासाठी तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविषयक संस्थांना वर्ष 2030पर्यंत पूर्ण करण्यासाठी निश्चित झालेली शाश्वत विकास ध्येये  गाठणे शक्य व्हावे म्हणून भारताने आयटीयूचे स्वप्न आणि संकल्पना स्वीकारल्या आहेत.

भारतातर्फे रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्य म्हणून एम.रेवती यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की एम.रेवती यांनी समावेशक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविकासासाठी  व्यावसायिकतेतील विशेष प्राविण्य, नेतृत्व करण्याची क्षमता,  कालबद्ध पद्धतीने विहित कार्ये पूर्ण करण्याप्रती वचनबद्धता, पद्धतशीरपणे समस्या सोडविण्याची क्षमता तसेच नियम निश्चित करण्याची हातोटी या गुणांसह स्वतःला सिध्द केले आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री चौहान ब्रीजिंग द डिजिटल डिव्हाईड या विषयावरील उच्चस्तरीय धोरणनिश्चिती सत्र, स्वास्थ्य, समावेश तसेच लवचिकता यासाठीची  माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उच्चस्तरीय संवाद यांसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

डब्ल्यूएसआयएस2022च्या कार्यक्रमासोबतच, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या तसेच, आयटीयूचे उपसचिव माल्कम जॉन्सन, इराणचे दळणवळण अनि माहिती तंत्रज्ञान मंत्री इस्सा झारेपोर, जपानचे धोरण समन्वयन उपमंत्री यूजी सासाकी, आयटीयूचे महासचिव हाओलीन झोऊ अशा विविध मान्यवर आणि तज्ञ व्यक्तींच्या भेटी घेतल्या.  

  

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1831079) Visitor Counter : 289