युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2021 साठी नामनिर्देशन पाठवण्याची अंतिम मुदत 16जून 2022
Posted On:
03 JUN 2022 11:50AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (टीएनएनएए) साहसाच्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि तरूण लोकांमध्ये सहनशक्ती, धोका पत्करण्याची तयारी, सांघिक कार्य आणि बदलत्या परिस्थितीत झटपट, तयार आणि परिणामकारक निर्णय घेण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता दिला जातो.
ब्रॉंझचा पुतळा, प्रमाणपत्र, आणि 15 लाख रूपयांची पुरस्काराची रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारत सरकारतर्फे देण्यात येणार्या अर्जुन पुरस्कारांसोबतच हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
सहसा, एक पुरस्कार चार वर्गवारीनुसार देण्यात येतो. भूमीवरील साहस. पाण्यातील (सागरी) साहस, आकाशातील(हवा) साहस आणि जमीन, सागर आणि हवेत साहसी कृत्यांबद्दल जीवनगौरव पुरस्कार असे ते आहेत. जीवनगौरव पुरस्कारासाठी संपूर्ण जीवनभर केलेल्या साहसी कृत्यांच्या क्षेत्रातील कामगिरीचा विचार केला जातो.
टीएनएनएए 2021 साठी नामनिर्देशन पत्रे https://awards.gov.in या संकेतस्थळावर 18 मे 2022 पासून ते 16 जून 2022 पर्यंत मागवण्यात येत आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर खालील यूआरएलवर पारितोषिकासाठी मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत.
https://yas.nic.in/youth-affairs/inviting -nominations-tenzing-norgay-national-adventure-award-2021.
कोणत्याही व्यक्तीकडे उत्कृष्ट कामगिरी आणि असामान्य नेतृत्वगुण, साहस करताना शिस्तीची जाणीव आणि साहसाच्या कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रात जसे की जमीन, आकाश किंवा पाणी(सागर) यात सातत्याने यश साध्य केले असेल तर त्या 16 जून 2022 पूर्वी वरील संकेतस्थळावर पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
****
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830753)
Visitor Counter : 299