गृह मंत्रालय
छत्तीसगड राज्यातील विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या अंतर्गत भागातून भरती मेळाव्याद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल म्हणून मूळ आदिवासी तरुणांना भरती करण्यासाठी कॉन्स्टेबल या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये शिथिलता देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Posted On:
01 JUN 2022 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF)दक्षिण छत्तीसगडमधील विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा या तीन जिल्ह्यांसाठी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी 400 उमेदवारांच्या भरतीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण होती ती 8 वी उत्तीर्ण अशी शिथिल करण्याच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
या तीन जिल्ह्यांच्या अंतर्गत भागातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे यासह या मेळाव्याच्या व्यापक प्रचारासाठी इतर सर्व मार्गांचा अवलंब करण्याव्यतिरिक्त, सीआरपीएफमधे या नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत औपचारिक शिक्षण सुध्दा देण्यात येईल.
यामुळे छत्तीसगड राज्यातील विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा या तीन जिल्ह्यांच्या सदूर भागातील 400 आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. भरतीसाठी शारिरीक मानकांमध्येही योग्य ती शिथिलता गृह मंत्रालयाकडून देम्यात येणार आहे.
सीआरपीएफ हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे, जे मुळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, बंडखोरीचा सामना करणे आणि अंतर्गत सुरक्षा राखणे यासारख्या कार्यांसाठी आहे. तात्काळ भरती प्रक्रीयेद्वारे सीआरपीएफने छत्तीसगड सारख्या तुलनेने मागासलेल्या भागातून 400 मूळ आदिवासी तरुणांना कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) म्हणून भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण विहित किमान शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरच त्यांना सेवेत निश्चित केले जाईल, अशा प्रकारे या भरतींना औपचारिक शिक्षण दिले जाईल आणि सीआरपीएफ त्यांच्या परिवेक्षण कालावधी दरम्यान अभ्यास साहित्य, पुस्तके आणि पूरक शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे यासारखे शक्य तेवढे सर्व सहकार्य केले जाईल. विहित शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्यासाठी नवीन भरती उमेदवारांची सोय करण्यासाठी, आवश्यक असल्यास, कालावधी योग्यरित्या वाढविला जाऊ शकतो. त्यांना 10 वी इयत्तेची परीक्षा देता यावी यासाठी, या भरती उमेदवारांना केंद्र/राज्य सरकारांद्वारे मान्यताप्राप्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमध्ये नोंदणी केली जाईल.
2016-2017 दरम्यान सीआरपीएफने छत्तीसगडमधील विजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि सुकमा या चार जिल्ह्यांमधून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती करून एक बस्तरीया बटालियन उभारली होती. तथापि, सदूर भागातील मूळ तरुणांकडून आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण न झाल्यामुळे भरती प्रक्रियेत स्पर्धेत उतरू शकले नव्हते.
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830150)
Visitor Counter : 176