रसायन आणि खते मंत्रालय

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे विभाग (फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया), या एजन्सीने मे 2022 मध्ये प्रथमच, 100 कोटी रुपयांची विक्री करण्याचा टप्पा केला पार


मार्च 2024 पर्यंत जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य

गेल्या 5 वर्षांत, या परियोजनेमुळे सर्वसामान्य जनतेच्या 15,000 कोटींहून अधिक रुपयांची झाली बचत

Posted On: 31 MAY 2022 4:03PM by PIB Mumbai

 

सर्वसामान्य माणसांना, विशेषत: गरिबांसाठी स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची (PMBJKs) संख्या 10000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 31.05.2022 पर्यंत या केंद्रांची संख्या 8735 पर्यंत वाढली आहे. देशातील 739 जिल्ह्यांतून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे (PMBJKs) सुरू झाली आहेत. 

A group of people standing in front of a signDescription automatically generated with medium confidence

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे(PMBJKs) ही आवश्यक औषधांची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. गेल्या 8 वर्षांच्या या प्रवासात,वर्ष 2014-15 मध्ये 8 कोटी रुपयांपासून सुरूवात करत,मे 2022 मध्ये 100 कोटी रुपये इतकी सर्वोच्च मासिक विक्री या केंद्रांवरून झाली आहे, ज्यामुळे देशातील नागरिकांच्या 600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.मे 2021मध्ये एकूण विक्री रु.83.77 कोटी इतकी झाली,आणि त्याच कालावधीत कोविड-19 ची दुसरी लाट उसळली होती.या योजनेमुळे लोकांचा औषधांवर होणारा खर्च कमी होऊ शकला आहे.सध्या ही केंद्रे सोळाशेहून अधिक औषधे आणि शल्यचिकित्सेसाठी लागणारी अडीचशेहून उपकरणे उपलब्ध करून देतात ज्यात आहारपूरक औषधे, आयुष उत्पादने आणि सुविधा सॅनिटरी पॅड्स आहेत ज्यांची 1/- रु.प्रति पॅड,या दराने विक्री होते.

पीएमबीजीपी  अंतर्गत, देशातील प्रत्येक नागरिकाला जनऔषधी केंद्रांद्वारे दर्जेदार जेनेरिक औषधे पुरवण्यासाठी 406 जिल्ह्यांतील 3579 तालुके समाविष्ट करण्यासाठी नवीन अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.लहान शहरे आणि तालुका मुख्यालयातील रहिवासी आता जनऔषधी केंद्रे उघडण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत 5 लाख रुपये पर्यंतच्या प्रोत्साहनाची तरतूद आहे, तसेच महिला, अनुसूचित जाती/जमाती डोंगराळ जिल्हे, बेटांवरील जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांसह विविध श्रेणींसाठी 2 लाख रुपये पर्यंतच्या विशेष प्रोत्साहनाची तरतूद आहे.यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत स्वस्त दरातील औषधांची सहज पोहोचणे सुनिश्चित होईल.

त्यानुसार गुरुग्राम, चेन्नई, गुवाहाटी आणि सुरत येथे चार गोदामे उभारून पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भारतातील प्रत्येक भागात वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये 39 वितरकांचे मजबूत वितरण नेटवर्क देखील आहे.

***

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829756) Visitor Counter : 181