अर्थ मंत्रालय

केंद्रीय वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी वार्ताहर परिषदेने केला आठवडाभर चालणाऱ्याआझादी का अमृत महोत्सव विषयक एकमेवाद्वितीय सोहळ्याचा प्रारंभ


कोविड- 19 महामारीच्या काळात अर्थव्यवस्था सावरणाऱ्या पडद्यामागच्या दिग्गजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वित्त मंत्रालयाने शुक्रिया हे आभारदर्शक गाणे प्रदर्शित केले

Posted On: 30 MAY 2022 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 6 ते  11 June, 2022 या कालावधीत आठवडाभर चालणाऱ्या एकमेवाद्वितीय सोहळ्याचा प्रारंभ वार्ताहर परिषदेने केला.

येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 आठवड्यांच्या उलट गणतीचा  प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2021 रोजी “आझादी का अमृत महोत्सव” (AKAM)उपक्रमाचे उद्घाटन केले होते,  आझादी का अमृत महोत्सव त्यानंतर वर्षभर, म्हणजेच  15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रिया हे  आभारदर्शक गाणे प्रदर्शित  केले.  कोविड 19 महामारीच्या काळात अर्थव्यवस्था सावरणाऱ्या आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अर्थचक्र सुरु ठेवणाऱ्या  पडद्यामागच्या दिग्गजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वित्त मंत्रालयाने शुक्रिया हे  आभारदर्शक गाणे प्रदर्शित  केले.

या आठवड्यात आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्यासाठी एक ई-पुस्तिका देखील सादर करण्यात आली ज्यामध्ये कॉर्पोरेट व्यवहार  आणि वित्त ही दोन मंत्रालये केवळ त्यांच्या कामगिरीचा आढावा आणि  नवीन उपक्रम दाखवणार नाहीत, तर गेल्या काही वर्षातला त्यांच्या मंत्रालयाच्या  वाढीचा आलेख दर्शवणारा  मनोरंजक प्रवास देखील दाखवतील.

कार्यक्रमांची रूपरेषा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं 6 जून  2022 रोजी होणाऱ्या उदघाटनपर कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी  उपस्थित राहतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पूर्ततेबद्दल   देशभर असणारा उत्साह लक्षात घेता   6 जूनचा  हा सोहळा भारतातील 75 शहरांमध्ये एकाच वेळी थेट साजरा केला जाईल.

आझादी का अमृत महोत्सवाच्या  सप्ताहादरम्यान, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाचा प्रत्येक विभाग त्यांचा समृद्ध इतिहास आणि वारसा तसेच पुढील आव्हानांना तोंड देण्याची तयारी दर्शवेल. उदाहरणार्थ, तिसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून 2022 रोजी भारतातील रोखे बाजाराच्या विकासावर एक माहितीपट प्रदर्शित केला जाईल; आणि शेवटच्या दिवशी, 11 जून 2022 रोजी, राष्ट्रीय सीमाशुल्क तसेच वस्तू  आणि  सेवाकर GST संग्रहालय, 'धरोहर', ने जप्त केलेल्या वस्तू, पुरातन वस्तू आणि सीमाशुल्क विभागाच्या वारसा असलेल्या वस्तू राष्ट्राला समर्पित केल्या जातील.

वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय सादर करत असलेल्या या सप्ताहातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमध्ये सार्वजनिक खरेदीमधील डेटा विश्लेषणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समावेश आहे. या परिषदेत  सार्वजनिक खरेदीच्या क्षेत्रातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींवर चर्चा होईल. याशिवाय  सार्वजनिक खरेदीमध्ये पैशाला  अधिक मूल्य मिळावं यादृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग याविषयावरही विचारमंथन होणार आहे.  सार्वजनिक खर्च व्यवस्थापन आणि करआकारणीमधील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर अशा काही प्रमुख घटकांवर भाष्य केले जाईल.

वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या या प्रतिष्ठित सप्ताहाच्या प्रारंभाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वित्त सचिव आणि खर्च विभागाचे सचिव , डॉ. टी.व्ही. सोमनाथन होते. याशिवाय  गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे ( DIPAM) सचिव तुहीन कांता पांडे, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा, सार्वजनिक उपक्रम विभागाचे (DPE) सचिव अली रझा रिझवी, आर्थिक सेवा विभागाचे ( DFS) सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC )चे  अध्यक्ष विवेक जोहरी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ( CBDT) च्या अध्यक्ष संगीता सिंग - अतिरिक्त प्रभार  आणि वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आझादी का अमृत महोत्सवाच्या आठवडाभराच्या आयकॉनिक  सोहळ्यासाठी वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासाठी ई-पुस्तिका:

खाली 11 भाषांमध्ये धन्यवाद संगीत/व्हिडिओ पहा (आसामी, बांगला, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू):

Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1829589) Visitor Counter : 180