पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 मे रोजी गुजरात दौऱ्यावर
विविध सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या चर्चासत्राला 'सहकार से समृद्धी' या विषयावर पंतप्रधान करणार मार्गदर्शन
इफ्को, कलोल येथे उभारलेल्या नॅनो युरिया (द्रव) प्रकल्पाचे पंतप्रधान करणार उद्घाटन
राजकोटमधील अटकोट इथल्या मातुश्री केडीपी मल्टीस्पेशॅलीटी रुग्णालयालाही पंतप्रधान देणार भेट, जाहीर सभेला करणार संबोधित
Posted On:
27 MAY 2022 9:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे, 2022 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. राजकोटमधील अटकोट इथल्या नव्याने बांधलेल्या मातुश्री केडीपी मल्टीस्पेशॅलीटी रुग्णालयाला सकाळी 10 वाजता पंतप्रधान भेट देतील. त्यानंतर कार्यक्रमस्थळी जाहीर कार्यक्रमात त्यांचे भाषण होणार आहे. तत्पश्चात, पंतप्रधान दुपारी 4 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर इथे 'सहकार से समृद्धी' या विषयावर विविध सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या चर्चासत्राला संबोधित करतील. तिथे ते बकलोल, इफ्को, इथे उभारलेल्या नॅनो युरिया (द्रव) प्रकल्पाचेही उद्घाटन करतील.
गांधीनगरमधे पंतप्रधान
गुजरातचे सहकार क्षेत्र संपूर्ण देशासाठी आदर्श राहिले आहे. राज्यात सहकार क्षेत्रातील 84,000 हून अधिक संस्था आहेत. सुमारे 231 लाख सभासद या संस्थांशी संबंधित आहेत. राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, 'सहकार से समृद्धी' या विषयावर विविध सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या चर्चासत्राचे आयोजन गांधीनगरमधील महात्मा मंदिर इथे होणार आहे. या चर्चासत्रात राज्यातील विविध सहकारी संस्थांचे सात हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करण्याच्या दृष्टिने, कलोल इफ्को, इथे सुमारे 175 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नॅनो युरिया (द्रव) प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. नॅनो युरियाच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठी वाढ होते हे लक्षात घेऊन अत्याधुनिक नॅनो खत प्रकल्पाची स्थापना केली आहे. या प्रकल्पात दररोज 500 मिलीच्या सुमारे 1.5 लाख बाटल्यांचे उत्पादन होईल.
राजकोट, अटकोटमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान भेट देत असलेल्या मातुश्री के.डी.पी. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे व्यवस्थापन श्री पटेल सेवा समाज करत आहे. इथे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली जातील आणि प्रदेशातील लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या भेटीनंतर पंतप्रधानांचे सार्वजनिक कार्यक्रमात भाषण होणार आहे.
******
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828697)
Visitor Counter : 177
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam