पंतप्रधान कार्यालय

श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी यांच्या 80 व्या जन्मदिवस समारंभानिमित्त पंतप्रधानांचा शुभेच्छा संदेश


निसर्गासाठी विज्ञानाचा उपयोग आणि तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा संयोग हा चैतन्यशील भारताचा आत्मा आहे

आज जग आमच्या स्टार्टअप्सकडे त्याचे भविष्य म्हणून पहात आहे. जागतिक विकासासाठी आमचे उद्योग आणि आमची मेक इन इंडिया आशेचा किरण ठरत आहेत

Posted On: 22 MAY 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गणपती सच्चिदानंद स्वामी जी यांचा 80 व्या जन्मदिवस समारंभाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी श्री गणपती सच्चिदानंद स्वामी जी आणि त्यांच्या अनुयायांना या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या. श्री मोदी यांनी हनुमतद्वार प्रवेशाची कमानीला संत आणि विशेष पाहुण्यांच्या हस्ते समर्पित करण्यात आल्याचाही उल्लेख केला.

धर्मग्रंथांतील दाखले देत, पंतप्रधान म्हणाले की, श्री  गणपती सच्चिदानंद स्वामी जी यांचे जीवन हे ‘संतांचा  उदय हा मानवतेच्या कल्याणासाठीच होत असतो’, याचे जिवंत उदाहरण असून त्यांचे जीवन हे सामाजिक उन्नती आणि मानवी कल्याण यात गुंफलेले असते. दत्तपीठम येथे आधुनिकतेचेही अध्यात्मिकतेबरोबरच संगोपन केले जाते, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. यासंदर्भात येथील विशाल हनुमान मंदिर थ्री डी मॅपिंग आणि प्रकाश आणि ध्वनी सोहळा तसेच आधुनिक व्यवस्थापनसह पक्ष्यांसाठी तयार केलेले निवासस्थान याचा दाखला दिला. पंतप्रधानांनी असे मत नोंदवले की, वेदांच्या अभ्यासासाठी महान केंद्र असण्याबरोबरच, दत्तपीठमने संगीताचा वापर आरोग्याच्या कारणांकरता करण्यासाठी परिणामकारी नाविन्यपूर्ण संशोधनही हाती घेतले आहे. हा विज्ञानाचा निसर्गासाठी उपयोग, हे तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा संयोग हा चैतन्यशील भारताचा आत्मा आहे. स्वामीजी यांच्यासारख्या संतांच्या प्रयत्नांमुळे, आज देशातील युवकांना आपल्या परंपरा आणि देशाला पुढे नेण्याची त्यांची शक्ती याचा परिचय  होत आहे, याचा मला आनंद आहे, असे श्री मोदी म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कालावधीत हा शुभ प्रसंग येत असल्यासंदर्भात, पंतप्रधानांनी स्वतःआधी जगाचा विचार करा, या संतांच्या शिकवणीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्रामुळे देश आज सामूहिक संकल्प करत आहे. आज देश आपली प्राचीन वैभवाचे जतन करत आहे, एवढंच नाही, तर जगभरात त्याची कीर्ती अभिमानाने सांगितली जात आहे. आणि त्याचवेळेस, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आधुनिकतेलाही बळ देत आहे. आज भारताची ओळख योग आणि युवक हीच आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. आज जग भारताच्या स्टार्टअप्सकडे त्यांचे भविष्य म्हणून पहात आहे.  आमचे  उद्योग आणि आमचा मेक इन इंडिया हा कार्यक्रम जागतिक विकासासाठी आशेचा किरण होत आहे. आम्हाला हे निर्धार साध्य करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. आणि मला या दिशेने आमची अध्यात्मिक केंद्रे प्रेरणेची केंद्रे झालेली पहायला मला आवडेल.

दत्तपीठमने निसर्गाचे जतन आणि पक्ष्यांप्रती केलेले सेवाकार्य नमूद करून, पंतप्रधानांनी दत्तपीठमला जल आणि नदीसंधारणासाठी काम करण्याची विनंती केली. त्यांनी ७५ जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ७५अमृत सरोवर मोहीम राबवण्यासाठीही त्यांनी दत्तपीठमला योगदानाची विनंती केली. स्वच्छ भारत अभियानात या संस्थेने दिलेल्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

 

* * *

R.Aghor/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827404) Visitor Counter : 183