पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर येथे रस्ते अपघातात मरण पावलेल्यांप्रति शोकभावना व्यक्त केल्या
मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून सानुग्रह मदत जाहीर.
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2022 10:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर येथे रस्ते अपघातातल्या जीवित हानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे ,
'उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत वेदनादायी आहे. मी शोकाकुल परिवारांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. अपघातात जखमी झालेले सर्व जण लवकर बरे होतील अशी मी प्रार्थना करतो'.
पंतप्रधानांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
***
SK/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1827332)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam