PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 20 MAY 2022 7:00PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 191.96 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 15,044
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.75%
  • 2,614 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,25,92,455
  • 2,259 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.50%)
  • Weekly Positivity Rate (0.53%)
  • 84.58 cr Total Tests conducted so far; 4,51,179 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 20 मे 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत कोविड-19 लसीकरणाच्या अतिशय मंद गतीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा व सर्व पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, राज्यांच्या आरोग्य सचिवांबरोबर तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर दूरदृश्य माध्यमातून कोविड लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेतल्यावर आज या सूचना दिल्या.

देशभरात कोविड19 लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जाण्याची तातडीची गरज अधोरेखित करत केंद्रीय आरोग्य सचिवांनी त्यांना जून-जुलै या दोन महिन्यांसाठी 'हर घर दस्तक' (घरोघरी जाऊन लसीकरण) मोहिमेचा दुसरा टप्पा चालवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी जिल्हा, तालुका आणि गावाच्या पातळीवर सविस्तर नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. पात्र व्यक्तींना लसीची पहिली, दुसरी आणि प्रिकॉशन मात्रा देऊन लसीकरण पूर्ण करणे हा 'हर घर दस्तक 2.0' अभियानाचा उद्देश आहे.

देशव्यापी कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी स्पष्ट आणि प्रभावी अशी संवाद प्रणाली आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी अधोरेखित केले.

कोविड प्रतिबंधक लस ही मौल्यवान राष्ट्रीय साधनसंपत्ती असल्याचे अधोरेखित करून, कोणत्याही परिस्थितीत त्या मात्रांची नासाडी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले. सक्रिय देखरेख आणि 'आधी मुदत संपणाऱ्या लसमात्रांचा आधी वापर' करण्याचे तत्त्व पाळून ही काळजी घेता येईल, असेही ते म्हणाले.

काही राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये, परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या मात्रेनंतर 90 दिवसांच्या आत प्रिकॉशन मात्रा घ्यावयाची असल्यास, संबंधित प्रवासाचा पुरावा सादर करण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827038) Visitor Counter : 51


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri