आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 191.96 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.24 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,044

गेल्या 24 तासात 2,259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.53%

Posted On: 20 MAY 2022 9:42AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.96 (1,91,96,32,518) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,41,17,166 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.24 (3,24,75,018) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,359

2nd Dose

1,00,32,661

Precaution Dose

50,77,626

FLWs

1st Dose

1,84,18,020

2nd Dose

1,75,70,727

Precaution Dose

83,02,533

Age Group 12-14 years

1st Dose

3,24,75,018

2nd Dose

1,33,64,363

Age Group 15-18 years

1st Dose

5,91,09,660

2nd Dose

4,45,34,980

Age Group 18-44 years

1st Dose

55,67,63,388

2nd Dose

48,63,52,174

Precaution Dose

5,16,058

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,78,740

2nd Dose

19,00,08,329

Precaution Dose

11,12,877

Over 60 years

1st Dose

12,70,39,365

2nd Dose

11,84,58,135

Precaution Dose

1,69,11,505

Precaution Dose

3,19,20,599

Total

1,91,96,32,518

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 15,044 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासात 2,614 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,92,455 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 4,51,179 चाचण्या करण्यात आल्याभारताने आतापर्यंत एकूण 84.58 (84,58,55,351) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.53% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.50% आहे.

***

JPS/JW/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826861) Visitor Counter : 185