पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपाला भेट देऊन प्रार्थना केली
Posted On:
16 MAY 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्धपौर्णिमेनिमित्त उत्तरप्रदेशमध्ये कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपाला भेट देऊन प्रार्थना केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज नेपाळमध्ये लुम्बिनी येथील भगवान बुद्ध यांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि मायादेवी मंदिरात प्रार्थना केली. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्यासह ते लुम्बिनी मठ परिसरात भारतीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामाच्या शीलान्यास समारंभात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी नेपाळच्या पंतप्रधानांसह लुम्बिनी येथील आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र आणि ध्यान केंद्रात आयोजित 2566 व्या बुद्ध जयंती समारंभात सहभागी झाले.
कुशीनगर येथील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणाले, “ कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपामध्ये प्रार्थना केली. या ठिकाणी अधिक पर्यटक आणि भाविकांना येता यावे यासाठी आमचे सरकार कुशीनगर येथील पायाभूत कामांना चालना देण्याचे अनेक प्रयत्न करत आहे.”
S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825880)
Visitor Counter : 242
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam