नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची इंटरसोलर युरोप 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी म्युनिक येथे उपस्थिती
केंद्रीय मंत्र्यांनी घेतली भारतीय समुदायाची भेट
विद्युत वाहन उत्पादकांसाठी भारतात गुंतवणुकीच्या उत्तम संधी: केंद्रीय मंत्री खुबा
गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी नवीकरणीय ऊर्जा उद्योगाबरोबर केली चर्चा
“इंडियाज सोलर एनर्जी मार्केट” मध्ये बीजभाषण देणार
Posted On:
12 MAY 2022 11:10AM by PIB Mumbai
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा इंटरसोलर युरोप 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी आज म्युनिक, जर्मनी येथे पोहोचले आहेत. “इंडियाज सोलर एनर्जी मार्केट” या गुंतवणूक प्रोत्साहन कार्यक्रमात त्यांचे आज बीजभाषण होणार आहे.
इंडो जर्मन एनर्जी फोरम (IGEF) चे संचालक टोबियास विंटर आणि नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया (NSEFI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम पुलिपाका यांनी खुबा यांचे स्वागत केले. त्यांनी म्युनिक येथे भारतीय समुदायाची भेट घेतली. तसेच इलेक्ट्रिक वाहनामधून प्रवास केला. ईव्ही उत्पादकांसाठी भारतात गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत असे ते यावेळी म्हणाले.
जगातील आघाडीच्या नवीकरणीय ऊर्जा उद्योग कंपनीच्या गट प्रमुखांशी यावेळी त्यांची चर्चा झाली. भारतात गुंतवणूक आणि नवीकरणीय ऊर्जा उत्पादकांसाठी असलेल्या संधी याविषयी चर्चा करण्यात आली.
***
S.Thakur/S.Kane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824651)
Visitor Counter : 202