वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ओमानचे उच्चस्तरीय, बहु-क्षेत्रीय शिष्टमंडळ 10-14 मे 2022 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर
भारत-ओमान संयुक्त आयोग बैठक (जेसीएम), संयुक्त व्यापार परिषद (जेबीसी), अनेक बीटूबी कार्यक्रम, उद्योग संवाद आणि गुंतवणूकदारांच्या बैठका हा दौऱ्याचा मुख्य अजेंडा
भारत आणि ओमानमधील आधीच घनिष्ट आणि गतिमान आर्थिक संबंध नव्याने अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्याची होणार मदत
Posted On:
10 MAY 2022 11:30AM by PIB Mumbai
ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय, बहु-क्षेत्रीय शिष्टमंडळ 10 ते 14 मे 2022 या कालावधीत भारत भेटीवर येत आहे. 48 सदस्यांच्या या शिष्टमंडळात आरोग्य, औषध निर्माण, खाणकाम, पर्यटन, दूरसंचार, ऊर्जा, नौवहन आणि बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश आहे.
या भेटीदरम्यान, नवी दिल्ली इथे 11 मे 2022 रोजी होणाऱ्या भारत-ओमान संयुक्त आयोगाच्या (जीसीएम) 10 व्या बैठकीत दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. भारताचे वाणिज्य आणि उद्योग, मंत्री पीयूष गोयल तसेच ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.
उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021-2022 या आर्थिक वर्षात
82% ने वाढून 9.94 अब्ज अमेरीकी डॉलर्सवर पोहोचला आहे, अशा महत्वाच्या वेळी ओमानी शिष्टमंडळाचा हा भारत दौरा होत आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील आधीच घनिष्ट आणि गतिमान आर्थिक संबंध नव्याने आणखी मजबूत करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे.
भारत-ओमान संयुक्त व्यापार परिषदेची (जेबीसी) बैठक 12 मे 2022 रोजी आयोजित केली जाईल. फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ आणि ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे. यात दोन्ही बाजूंचे मंत्री मार्गदर्शन करतील तसेच भारत आणि ओमानच्या व्यापारी समुदायांशी संवाद साधतील. भारतातील मुक्कामादरम्यान भेट देणाऱ्या ओमानी शिष्टमंडळासाठी बीझनेस टू बीझनेस कार्यक्रम, उद्योग संवाद, गुंतवणूकदारांच्या बैठका इत्यादींसह नवी दिल्ली आणि मुंबईत इतर अनेक कार्यक्रम नियोजित आहेत.
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824119)
Visitor Counter : 222