दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
नवी दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता येथील केंद्रांवर आयोजित 2022च्या आरटीआर (ए) परीक्षेचे वेळापत्रक दूरसंचार विभागाच्यावायरलेस नियोजन आणि समन्वय विभागाने केले जारी
Posted On:
09 MAY 2022 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2022
भारत सरकारच्या दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालयाने चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता येथील केंद्रांवर आयोजित 2022 च्या रेडिओ टेलिफोनी रिस्ट्रिक्टेड (एरो) परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे.यासंबंधीची माहिती दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर (https://dot.gov.in/spectrummanagement/release-rtr-exam-schedule-chennai-new-delhi-hyderabad-and-kolkata-centres-year ) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतीय वायरलेस टेलिग्राफी (व्यावसायिक रेडिओ परिचालकाचे प्रावीण्य प्रमाणपत्र आणि वायरलेस टेलीग्राफी चालवण्याचा परवाना) नियम, 1954 आणि त्यानंतर केलेल्या सुधारणा अंतर्गत एरो मोबाइल सेवेमध्ये काम करण्यासाठी प्रावीण्य आणि परवाना प्रमाणपत्र देण्यासाठी दळणवळण मंत्रालय, दूरसंचार विभाग, वायरलेस नियोजन आणि समन्वय विभागाच्या वतीने रेडिओ टेलिफोनी रिस्ट्रिक्टेड (एरो) परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे :
TABLE 1
SL No
|
Centre
|
Date of Commencement of Examination (Tentative)
|
Tentative date for receiving hard copy of the application at concerned RLO
|
Hard Copy to be sent to Regional Licensing Officer (RLO) as per Table-2 mentioned in NOTICE
|
Start Date
|
Last Date
|
-
|
Chennai
|
27-06-2022
|
07-05-2022
|
21-05-2022
|
Chennai
|
-
|
New Delhi
|
22-08-2022
|
15-06-2022
|
30-05-2022
|
New Delhi
|
-
|
Hyderabad
|
17-10-2012
|
15-08-2022
|
30-08-2022
|
Hyderabad
|
-
|
Kolkata
|
12-12-2022
|
15-10-2022
|
30-10-2022
|
Kolkata
|
सुचनेमधे नमूद करण्यात आले आहे की, '' “वरील तारखा (तक्त्यामधे नमूद केलेल्या) तात्पुरत्या/अंतरिम आहेत, त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.तथापि, प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांना, दूरसंचार विभागाच्या (डीओटी ) संकेतस्थळाद्वारे सुधारित तारखांसंदर्भात सूचित केले जाईल आणि परीक्षेचे स्थळ दूरसंचार दूरसंचार विभागाच्या (डीओटी ) संकेतस्थळाद्वारे निश्चित केले जाईल''. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या कोविड-19 प्रतिबंधासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे/प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करण्याचे निर्देश परीक्षेशी संबंधित सर्व उमेदवार, परीक्षक, समन्वयक आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
वरील तक्ता-1 मध्ये नमूद केल्यानुसार, अर्जाची मुद्रित प्रत संबंधित (प्रादेशिक परवाना अधिकारी) आरएलओकडे विहित कालावधीत सादर करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
NOTICE
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823859)
Visitor Counter : 827