पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशातील आग दुर्घटनेत झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 07 MAY 2022 1:55PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेशातील आग दुर्घटनेत झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे :

"मध्य प्रदेशातील इंदुर इथले अग्निकांड अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी कामना करतो: पंतप्रधान @narendramodi"

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823477) Visitor Counter : 147