रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार प्रमाणपत्र- व्यवसाय सुलभतेशी संबंधित जाहीर केलेली मसुदा अधिसूचना

Posted On: 07 MAY 2022 2:10PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 5.5.2022 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील काही तरतुदींमधील सुधारणांबाबत व्यापार प्रमाणपत्राशी संबंधीत एक मसुदा अधिसूचना प्रकाशित केली आहे.

नोंदणीकृत नसलेल्या किंवा तात्पुरती नोंदणी न केलेल्या वाहनांच्या बाबतीत हे व्यापार प्रमाणपत्र आवश्यक आहे.अशी वाहने केवळ डीलर/उत्पादक/मोटार वाहन आयात करणारे किंवा नियम 126 मध्ये निर्दिष्ट केलेल्या चाचणी एजन्सीच्या किंवा केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेल्याच कोणत्याही घटकाच्या ताब्यात राहू शकतात.

"व्यवसाय सुलभता" वाढविण्याला प्रोत्साहन देण्यासाठी, असा प्रस्ताव मांडला गेला आहे, की अशी एजन्सी रस्ते वाहतूक कार्यालयाला (RTO) भेट न देता, वाहन पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे एकाधिक प्रकारच्या वाहनांसाठी व्यापार प्रमाणपत्र आणि व्यापार नोंदणी चिन्हांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अर्ज करू शकते.अर्ज केलेल्या व्यापारनोंदणी संख्येच्या आधारे शुल्क सुनिश्चित करण्याचा देखील प्रस्ताव पुढे आहे.  व्यापार प्रमाणपत्र आणि नोंदणी चिन्हे पोर्टलवर ऑनलाइन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाटप करण्याचे प्रस्तावित असल्यामुळे, व्यापार प्रमाणपत्राचे नुकसान किंवा नाश झाल्याची माहिती आणि पुन्हा अर्ज करण्यासाठी होणारा त्रास वाचण्यासाठी; पूर्वीची पध्दत बंद करण्यात आली आहे.  व्यापार प्रमाणपत्राची वैधता 12 महिन्यांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यासंदर्भात शासकीय अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

S.Thakur/S. PatgaonkarP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823466) Visitor Counter : 208