मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांनी प्रोजेक्ट अर्थ आणि इनॅक्ट्स आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना "गो काष्ट" यंत्र केले सुपूर्द

Posted On: 06 MAY 2022 3:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2022

 

प्रोजेक्ट अर्थ आणि इनॅक्ट्स आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना गायीच्या शेणा संदर्भातील, "गो काष्ट" हे यंत्र केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, यांनी आज   सुपूर्द केले.

लांब आकाराच्या शेणाच्या गोवऱ्या तयार करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या इंधनासाठी वापरल्या जाऊ शकतात. या यंत्रात शेण आणि गुरांचा कचरा (सुका कचरा भातपिक) यांचे मिश्रण टाकले जाते. नंतर यंत्रात त्यावर प्रक्रिया होते. चुरा केला जातो, मिश्रण केले जाते. त्या मिश्रणाला लांब आकार दिला जातो. नंतर या गोवऱ्या उन्हात वाळवल्या जातात आणि मग विविध परिस्थितींमध्ये इंधन लाकूड म्हणून वापरले जाऊ शकते.

दररोज 3000 किलो शेणावर प्रक्रिया करून 1500 किलो शेण-आधारित गोवऱ्या हे यंत्र तयार करू शकते. 5-7 मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी हे लाकडाऐवजी वापरले जाऊ शकते, त्यामुळे अंदाजे 2 झाडे वाचवतात.  याचाच अर्थ असा की गोशाळेला दर महिन्याला अंदाजे 150,000 ते 170,000 किलो शेणाच्या विल्हेवाटीसाठी मदत होऊ शकते.

गाईच्या शेणावर आधारित हे यंत्र वापरल्याने गोशाळेला त्यांच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्यास, तिथल्या कर्मचाऱ्यांना किंवा जवळच्या गावकऱ्यांना रोजगाराचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी आणि जंगलतोड कमी करण्यात योगदान मिळू शकते.

दूध न देणाऱ्या गायींनांही आर्थिक चक्रात सामावून घेण्यास यामुळे मदत होते, गोशाळेतील सर्व गायींना आधार देण्यासाठी निधी निर्माण करते.

 

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823239) Visitor Counter : 188