आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 189.81 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.99 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,688

गेल्या 24 तासात 3,545 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.79%

Posted On: 06 MAY 2022 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 189.81 (1,89,81,52,695) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,35,44,994 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2.99 (2,99,46,931) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,05,505

2nd Dose

1,00,21,230

Precaution Dose

48,82,761

FLWs

1st Dose

1,84,16,372

2nd Dose

1,75,47,929

Precaution Dose

78,10,574

Age Group 12-14 years

1st Dose

2,99,46,931

2nd Dose

88,48,920

Age Group 15-18 years

1st Dose

5,86,32,450

2nd Dose

4,28,97,083

Age Group 18-44 years

1st Dose

55,59,72,104

2nd Dose

48,04,83,216

Precaution Dose

2,34,305

Age Group 45-59 years

1st Dose

20,29,75,086

2nd Dose

18,85,35,769

Precaution Dose

7,16,433

Over 60 years

1st Dose

12,69,06,067

2nd Dose

11,74,76,961

Precaution Dose

1,54,42,999

Precaution Dose

2,90,87,072

Total

1,89,81,52,695

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 19,688 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासात 3,549 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,51,248 झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,545 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,65,918 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.98  (83,98,44,925) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.79% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.76% आहे.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823229) Visitor Counter : 174