संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 चे निवृत्तीवेतन वितरीत न केल्याबद्दल स्पष्टीकरण

Posted On: 04 MAY 2022 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2022

 

एप्रिल 2022 मध्ये संरक्षण विभागातील निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाचे  वितरण न केल्याबद्दल प्रसारमाध्यमे  आणि समाजमाध्यमांमध्ये  चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर , सर्व संबंधितांच्या माहितीसाठी  खालील स्पष्टीकरण जारी करण्यात येत आहे.

मासिक निवृत्तेवेतनाची प्राप्ती सुरू ठेवण्यासाठी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी  वार्षिक ओळख पटवून देण्यासाठी हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया  पूर्ण करणे आवश्यक आहे, हे कार्य सामान्यतः निवृत्तीवेतन वितरण संस्था म्हणून काम करणाऱ्या सर्व बँकांद्वारे नोव्हेंबर 2021 मध्ये केले जाते.कोविड परिस्थितीमुळे, सरकारने 30 नोव्हेंबर 2021 रोजी देय असलेल्या वार्षिक ओळख प्रमाणपत्र सादर करण्याची  मुदत  31 मार्च 2022 पर्यंत वाढवली होती.

त्यानुसार निवृत्तीवेतन वितरित करण्यासाठी  असलेली प्रणाली एसपीएआरएसएचच्या (SPARSH) माध्यमातून, (01.01.2016 निवृत्त झाल्यानंतर) 31 मार्च 2022 पर्यंत पाच लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना आणि वारसा  यंत्रणेच्या माध्यमातून एसपीएआरएसएचमध्ये स्थलांतरित झालेल्या  4.47 लाख निवृत्तीवेतनधारकांना मासिक निवृत्तीवेतनाचे  यशस्वीपणे वितरण करत आहे.

तथापि, एप्रिल 2022 च्या निवृत्तीवेतनाच्या प्रक्रियेदरम्यान, सुमारे 3.3 लाख निवृत्तीवेतनधारकांचे  वार्षिक ओळख प्रमाणपत्र अद्ययावत करण्यात आले नसल्याचे समोर आले. त्यांची  सूची सर्व निवृत्तीवेतन  वितरण बँकांना देण्यात आली आणि त्यांच्याकडून माहीती मागविण्यात आली.  परिणामी25 एप्रिल 2022 पर्यंत एसपीएआरएसएचवर 2.65 लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांची ओळख स्थितीअद्ययावत करण्यात आली

तथापि, बँका (पूर्वीची निवृत्तीवेतन वितरण संस्था ) 58,275 निवृत्तीवेतनधारकांच्या ओळखीची पुष्टी करू शकल्या नाहीत आणि महिना अखेरपर्यंत  त्यांचे ओळख प्रमाणपत्र थेट एसपीएआरएसएचवर प्राप्त झाले नाही. त्यामुळे या निवृत्तीवेतनधारकांना  एप्रिल 30, 2022 पर्यंत त्यांचे एप्रिल महिन्याचे निवृत्तीवेतन  दिले गेले नाही.

अशा निवृत्तीवेतनधारकांना त्रास होऊ नये म्हणून, या 58,275 निवृत्तीवेतनधारकांना 25 मे 2022 पर्यंत त्यांची ओळख पटवून देण्यासाठी एकवेळ विशेष सवलत देण्यात आली आहे.

एप्रिल 2022 महिन्याच्या निवृत्तीवेतनासंदर्भात  आता प्रक्रिया करण्यात आली आहे आणि हे निवृत्तीवेतन 04 मे 2022 रोजी   जमा होणार आहे.अशा सर्व निवृत्तिवेतनधारकांना  एसएमएस आणि ईमेलद्वारे प्रलंबित वार्षिक ओळख  पटवण्याबाबतची  माहिती दिली जात आहे.

ओळख प्रमाणपत्र दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, निवृत्तीवेतनधारकांना विनंती आहे की, त्यांनी जवळच्या सीएससी  (https://findmycsc.nic.in/) वर संपर्क साधावा तसेच त्यांना एसपीएआरएसएच पीपीओ क्रमांक वापरून जीवन प्रमाणद्वारे आणि पीडीएला एसपीएआरएसएच पीसीडीए (पी) म्हणून निवडून त्यांचे वार्षिक ओळख प्रमाणपत्र  अद्ययावत करता येईल.

विविध प्रक्रिया आणि कार्यपद्धतींमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने ,संरक्षण लेखा विभागासह संरक्षण मंत्रालयात  मोठे परिवर्तन होत आहे.डिजीटल इंडिया,थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी ) आणि किमान सरकार, कमाल प्रशासन या सरकारच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, संरक्षण बिभागा अंतरंगात असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्याच्या दृष्टीने, डिजिटायझेशन आणि वारसा प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासह  संरक्षण मंत्रालयाच्या उपक्रमाच्या रूपात निवृत्तीवेतन प्रदान  प्रणाली (संरक्षण ) (एसपीएआरएसएच) ची संकल्पना मांडण्यात आली.

 एसपीएआरएसएच पोर्टलवर https://sparsh.defencepension.gov.in/ या दुव्याच्या माध्यमातून प्रवेश करता येईल.

 

 

 

 

M.Iyengar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822603) Visitor Counter : 458