पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसंदर्भातील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित
"अत्यंत गरीब आणि सगळ्यात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पुर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही वचनबद्ध आहोत”
कोणत्याही पायाभूत सुविधांच्या विकासगाथेच्या केंद्रस्थानी जनता असली पाहिजे. भारतात आम्ही याच अनुषंगाने कार्यरत आहोत."
जर आपण पायाभूत सुविधा प्रतिरोधक बनवल्या तर आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी आपत्ती टाळू शकतो”
Posted On:
04 MAY 2022 10:28AM by PIB Mumbai
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट महामहिम मॉरिसन एमपी, घानाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम नाना अड्डो डंकवा अकुफो-अड्डो, जपानचे पंतप्रधान महामहिम फ्युमियो किशिदा, आणि मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष महामहिम एंड्री निरिना राजोएलिना यांनीही या सत्राला संबोधित केले.
प्रारंभी, पंतप्रधान मोदीं यांनी कोणालाही मागे न ठेवण्याच्या, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या वचनाबद्दल परिषदेत स्मरण करून दिले. "म्हणूनच, आम्ही सर्वात गरीब आणि असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पुर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे ते म्हणाले. पायाभूत सुविधा म्हणजे लोकांसाठी असलेल्या सुविधा आणि त्यांना समन्यायी पद्धतीने उच्च दर्जाच्या, विश्वासार्ह आणि शाश्वत सेवा पुरवणे,'' असे पंतप्रधानांनी सांगितले. कोणत्याही पायाभूत सुविधांच्या विकास गाथेमध्ये केंद्रस्थानी जनता असली पाहिजे आणि, भारतात आम्ही त्याच प्रकारे कार्यरत आहोत.'' असे ते म्हणाले.
शिक्षण, आरोग्य, पेयजल, स्वच्छता, वीज, वाहतूक आणि अन्य बहुतांश क्षेत्रात भारत मूलभूत सेवांच्या तरतुदीत वाढ करत आहे, “आम्ही अगदी थेट मार्गाने हवामान बदलाचा सामना करत आहोत. म्हणूनच, सीओपी -26 मध्ये आम्ही आमच्या विकासात्मक प्रयत्नांच्या समांतर 2070 पर्यंत उत्सर्जनासंदर्भातील 'निव्वळ शून्य' उद्दिष्ट गाठण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. मानवी क्षमतांना वाव देण्यासाठी पायाभूत सुविधांचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि ते म्हणाले की, पायाभूत सुविधांचे नुकसान पिढ्यानपिढ्यांचे कायमचे नुकसान करते." आपल्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान याआधारे आपण शाश्वत प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करू शकतो का?" असे या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी विचारले. या आव्हानाची निश्चिती सीडीआरआय म्हणजेच आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीच्या निर्मितीला पाठबळ आहे, असे ते म्हणाले. या आघाडीचा विस्तार झाला आहे आणि या आघाडीने मौल्यवान योगदान दिले आहे, हे त्यांनी नमूद केले. त्यांनी सीओपी -26 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'द्वीपकल्पीय देशांसाठी प्रतीरोधक पायाभूत सुविधा' या उपक्रमाचा उल्लेख केला आणि सीडीआरआय जगभरातील 150 विमानतळांचा अभ्यास करत आपत्ती प्रतिरोधक विमानतळांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. सीडीआरआयच्या नेतृत्वाखालील 'पायाभूत सुविधा यंत्रणेच्या आपत्ती प्रतिरोधकतेचे जागतिक मूल्यांकन' हे जागतिक माहिती संग्रह तयार करण्यात मदत करेल जे अत्यंत मौल्यवान असेल, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
आपले भविष्य आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी आपल्याला 'प्रतिरोधक पायाभूत सुविधा संक्रमण 'च्या दिशेने काम करावे लागेल. प्रतिरोधक पायाभूत सुविधा देखील आपल्या व्यापक समायोजन प्रयत्नांचा केंद्रबिंदू असू शकतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. "जर आपण पायाभूत सुविधा प्रतिरोधक बनवल्या तर, आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी आपत्ती टाळू शकतो", असे ते म्हणाले.
****
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822558)
Visitor Counter : 282
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam