ग्रामीण विकास मंत्रालय
‘आझादी से अंत्योदय तक’ या 90 दिवसांच्या मोहिमेचा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला प्रारंभ
Posted On:
28 APR 2022 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी आज ‘आझादी से अंत्योदय तक’ या 90 दिवसांच्या मोहिमेचा प्रारंभ केला, ज्यामध्ये 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 75 जिल्ह्यांचा 09 केंद्रीय मंत्रालयांच्या लाभार्थी योजनांसह संपूर्ण विकास करण्याचे ध्येय आहे. वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) कार्यक्रमासाठी निवडलेले जिल्हे 99 स्वातंत्र्यसैनिकांच्या जन्मस्थानाशी निगडित आहेत, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान दिले.
संपूर्ण विकास दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना 17 निवडक योजनांचे थेट सहाय्य देणे, ग्रामीण भागातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत प्रत्येक सहभागी मंत्रालय/विभागांद्वारे पोहोचणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
आझादी से अंत्योदय तक मोहीम ही अमृत महोत्सवाच्या दिशेने सरकारचे एक ठोस पाऊल असल्याचे वर्णन करताना, केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व 9 मंत्रालयांनी लोकसहभागासह एकजुटीने काम केले पाहिजे. व्यापक प्रत्यक्ष देखरेखीखाली संपूर्ण विकास दृष्टिकोनातून आम्ही या 17 योजना राबवू. मोहीम पूर्ण झाल्यानंतर ते अहवाल म्हणून ठेवले जाईल”, असेही मंत्री म्हणाले.
75 जिल्ह्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821018)
Visitor Counter : 271