युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बंगरुळु इथे आजपासून सुरु होत असलेल्या ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2021’च्या निमित्ताने  क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पर्धकांशी साधला संवाद


सर्व स्पर्धकांसाठी या स्पर्धा अविस्मरणीय ठरतील, हे सुनिश्चित करण्यासाठी ठाकूर यांनी सर्व तयारी व्यवस्थेचा घेतला आढावा

Posted On: 24 APR 2022 7:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज जैन विद्यापीठ ग्लोबल कॅम्पस या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धास्थळाला अचानक भेट देत सर्व तयारीचा आढावा घेतला. याच परिसरात, 13 क्रीडा प्रकारातील -ज्यात यंदा मल्लखांब आणि योगासने देखील आहेत, त्यांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

यावेळी युवा मंत्र्यांनी विविध क्रीडाप्रकारांच्या मैदानावर जाऊन सर्व पूर्वतयारीची पाहणी केली आणि सर्व स्पर्धकांसाठी या स्पर्धा अविस्मरणीय ठरतील, हे सुनिश्चित केले. क्रिकेटर म्हणून, आपले मैदानावर खेळण्याचे दिवस आठवून ते म्हणाले, जैन विद्यापीठ आणि कर्नाटकचे सरकार, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहेत, आणि स्पर्धकांना उत्तम सुविधा इथे पुरवल्या जात आहेत. आज या खेळाडूंना इथे पाहून मला माझे विद्यापीठातले दिवस आठवले, जेव्हा मी क्रिकेट खेळत असे. आमच्या काही स्पर्धा, बिहारच्या दरभंगा आणि समस्तीपूर इथे झाल्या होत्या, जिथे सुविधा फार चांगल्या नव्हत्या. मात्र, आज पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत, आज स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आपण बघू शकतो. KIUG च्या माध्यमातून सर्व उदयोन्मुख खेळाडूंना एक उत्तम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे."

उदयोन्मुख खेळाडूंना आपण काय संदेश दयाल, असे विचारले असता, अनुराग ठाकूर म्हणाले, खिलाडूवृत्तीने स्पर्धेत भाग घ्या. मी त्यांना असा सल्ला देईन की त्यांनी, स्वच्छ निकोप स्पर्धा खेळाव्यात, कुठल्याही अमली पदार्थांचा आधार घेण्याच्या मोहात पडू नये. म्हणूनच आम्ही नाडा (NADA) च्या लोकांनाही इथे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच, विद्यापीठ स्तरावर डोपिंग बद्दल अधिक जनजागृती करण्यासाठी बोलावले आहे.

यावेळी ठाकूर यांनी विविध विद्यापीठातील स्पर्धकांशी संवाद साधत त्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेतल्या.

यावेळी एका खेळाडू एसआरएम विद्यापीठाचे एस. संतोष या व्हॉलिबॉलपटूसोबत त्यांनी संवाद साधला, त्यांनंतर संतोषने आपला अनुभव सांगितला. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर जी यांच्याशी भेटीचा अनुभव अतिशय हृद्य होता  त्यांनी आम्हाला कष्ट करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.  तसेच आपले विद्यापीठ आणि राज्याचे पुढेही प्रतिनिधित्व करत राहावे असे सांगितले. जेव्हा खुद्द वरिष्ठ मंत्री आपल्याशी संवाद साधतात,आपल्या खेळाविषयी विचारपूस करतात, तेव्हा आपल्याला सद्गदीत वाटतं.

क्रीडा मंत्री सकाळी व्हॉलिबॉल मैदानावर आले त्यावेळी एच आरएम (हिमाचल प्रदेश विद्यापीठ) आणि एडब्ल्यूयू (अदमास विद्यापीठ, पश्चिम बंगाल) यांच्यातल्या महिला चमूत  तसेच एसआरएम विद्यापीठ चेन्नई आणि एडब्ल्यूयू यांच्यात सामने सुरु होते. त्यांनी दोन्ही चमूबरोबर संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि प्रेक्षकांशीही संवाद साधला. त्याशिवाय  स्वतः देखील थोडावेळ व्हॉलिबॉल खेळले.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819617) Visitor Counter : 207