आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 187.26 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.57 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,241

गेल्या 24 तासात 2,451 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.47%

Posted On: 22 APR 2022 9:51AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 187.26 (1,87,26,26,515)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,29,29,662 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.57 (2,57,74,412) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 2,71,983 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आली.

 

 सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,04,612

2nd Dose

1,00,10,767

Precaution Dose

46,61,090

FLWs

1st Dose

1,84,14,718

2nd Dose

1,75,30,063

Precaution Dose

72,67,805

Age Group 12-14 years

1st Dose

2,57,74,412

2nd Dose

17,60,748

Age Group 15-18 years

1st Dose

5,80,47,891

2nd Dose

4,10,25,125

Age Group 18-44 years

1st Dose

55,54,11,836

2nd Dose

47,45,75,182

Precaution Dose

58,278

Age Group 45-59 years

1st Dose

20,28,73,223

2nd Dose

18,71,84,041

Precaution Dose

2,13,705

Over 60 years

1st Dose

12,68,31,286

2nd Dose

11,66,05,363

Precaution Dose

1,39,76,370

Precaution Dose

2,61,77,248

Total

1,87,26,26,515

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 14,241 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.गेल्या 24 तासांत 1,589 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,16,068 झाली आहे.


गेल्या 24 तासात 2,451 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 4,48,939  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.38 (83,38,25,991)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.47% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.55% आहे.

***

SK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1818960) Visitor Counter : 206