कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांनी एका दिवसात 700 हून अधिक ठिकाणी आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळ्याचे उद्‌घाटन केले; राष्ट्रीय अभियान राबवण्यासाठी प्रशिक्षणार्थी ही एक सहभागी चळवळ बनवण्याचे केले आवाहन


पंतप्रधानांच्या स्किल इंडिया अभियानाला चालना देत, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज देशभरातील 700 हून अधिक ठिकाणी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळ्याचे डिजिटल उद्‌घाटन केले

Posted On: 21 APR 2022 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

ऊर्जा, किरकोळ क्षेत्र, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि अन्य 30 हून अधिक उद्योगांमधील 4000 हून अधिक संस्थांनी या कार्यक्रमात भाग घेतला. 5वी-12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, आयटीआय डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असलेल्या व्यक्ती प्रधानमंत्री प्रशिक्षणार्थी मेळ्यात सहभागी होण्यासाठी पात्र होत्या. अंदाजे एक लाख शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीला प्रोत्साहन देणे आणि नियोक्त्यांना प्रशिक्षण आणि व्यावहारिक कौशल्ये यांच्याद्वारे त्यांची क्षमता ओळखण्यात आणि विकसित करण्यात मदत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

तसेच, त्यांना नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी सरकारी मानकांनुसार मासिक विद्यावेतन मिळेल, ते शिकत असताना कमावण्याची संधी मिळेल. उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) द्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळतील, प्रशिक्षणानंतर त्यांच्या रोजगाराची शक्यता वाढेल.

राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळ्याच्या उदघाटन प्रसंगी बोलताना, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मला आनंद आहे की देशातील 700 ठिकाणच्या 4,000 हून अधिक संस्था आमच्या तरुणांना लाभदायक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मेळ्यात सहभागी होत आहेत. उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, रेल्वे, किरकोळ आणि इतर अनेक उदयोन्मुख क्षेत्रांतील रोजगार प्रदाते प्रशिक्षणार्थी मेळ्यासाठी आलेले पाहणे समाधानकारक आहे.

 प्रधान म्हणाले की, भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना शैक्षणिक क्रेडिट दिले जाईल. तरुण भारताला कुशल, कौशल्याधारित आणि कौशल्यप्रधान बनवण्यासाठी, दरडोई आर्थिक उत्पादकता वाढवण्याकरिता आणि राष्ट्रीय अभियान राबवण्यासाठी प्रशिक्षणार्थी ही एक सहभागी चळवळ बनवायची आहे.

तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळा हा मासिक कार्यक्रम असेल. प्रशिक्षण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि 21 व्या शतकातील संबंधित संधींशी आमच्या तरुणांना जोडण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड ची व्यवस्था केली जाईल.

 

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1818725) Visitor Counter : 156