कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंधराव्या नागरी सेवा दिवस कार्यक्रमाचे विज्ञान भवन येथे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्घाटन;
नागरिक-केंद्री दृष्टिकोन भारत @2047 प्रशासन प्रारूप निश्चित करेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे प्रतिपादन
Posted On:
20 APR 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022
नागरिक केंद्री दृष्टिकोन , भारत @2047 प्रशासन प्रारूप निश्चित करेल , असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज केले.
पंधराव्या नागरी सेवा दिवस कार्यक्रमाचे विज्ञान भवन येथे उद्घाटन करताना डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की नव्या शासकीय प्रारूपात नागरिक अनुकूल धोरण हाच नागरी सेवकांसाठी योग्य पर्याय असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून ते म्हणाले, “नागरी सेवा दिनाचा खरा अर्थ सामान्य माणसाला समर्पित करणे हा आहे आणि प्रत्येक नागरी सेवकाने सामान्य माणसाच्या जीवनात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचा ठाम निर्धार करायला हवा”.
2047 मधला भारत एक दृष्टिक्षेप-. नागरिक आणि शासनाला जवळ आणणे ( Vision India@2047 – Bringing Citizens and Government closer) ही नागरी दिवस 2022 ची मुख्य संकल्पना आहे, याचा उल्लेख करून जितेंद्र सिंग म्हणाले की कित्येक वर्षांपासून सामान्य माणसाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आणि नागरी सेवकांनी आपल्या भविष्यातील भूमिकेबद्दल गंभीर आत्मपरीक्षण करून सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
सरकारच्या अनेक प्रमुख योजनांपैकी बहुतेक प्रमुख योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित असल्यामुळे नवीन आणि आव्हानात्मक अशा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नागरी सेवकांनी स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे असेही जितेंद्र सिंग यांनी नमूद केले.
निश्चित प्राधान्य कार्यक्रम आणि नवोन्मेष या संदर्भातील 2019, 2020 आणि 2021 या वर्षांतील पारितोषिक प्राप्त उपक्रमांच्या प्रदर्शनाचे जितेंद्र सिंग यांनी उद्घाटन केले. 'Vision India @ 2047-Governance’ या या विषयावर आधारित संपूर्ण सत्रात जितेंद्र सिंग यांनी अध्यक्ष म्हणून त्यांनी भाग घेतला.
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818472)
Visitor Counter : 222