आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्यात, दिनांक 19 एप्रिल रोजी 3 लाख 57 हजारांहून अधिक लोक झाले सहभागी; देशभरात दुसऱ्या दिवशी 490 तालुक्यात आरोग्य मेळाव्यांचे झाले आयोजन


60,000 हून अधिक आभा आरोग्य ओळखपत्र केली तयार ;21,000 पीएमजेएवाय गोल्डन पत्रे वितरीत आणि 25,000 रुग्णांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला केला प्राप्त

Posted On: 20 APR 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयविविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने 16 एप्रिल ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य  आणि कल्याण केंद्रांचा (AB-HWCs) चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात  साजरा केला जात आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान आरोग्य सचिव/आरोग्य सचिव, राज्य आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी आणि स्थानिक मान्यवरही आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या कल्याण केंद्रांना (AB-HWCs)भेटी देत सहभागी झाले आहेत आणि आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांना भेट देत आहेत  आणि परवडणारी आणि सुलभ आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी असलेले त्यांचे महत्त्व लोकांना पटवून देत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत.

18-22 एप्रिल 2022 या कालावधीत , राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एकातरी  तालुक्यात  एक लाखाहून अधिक केंद्रांमध्ये (AB-HWCs मध्ये) तालुकास्तरीय  आरोग्य  मेळावे आयोजित केले जात आहेत.  प्रत्येक तालुकास्तरीय  आरोग्य मेळा हा  एका दिवसासाठी असून राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक तालुक्यात  हा मेळावा साजरा  केला जाईल.

आरोग्य मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी,देशभरात जवळपास  490 तालुक्यांत  आरोग्य मेळे आयोजित करण्यात आले होते.  3 लाख 57 हजारांहून अधिक लोक यात सहभागी झाले होते.  तसेच 60,000 हून अधिक  आभा आरोग्य ओळखपत्र (आभा हेल्थ आयडी,ABHA) तयार केली  गेली  आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत  (पीएमजे,PMJAY) 21,000 गोल्डन कार्ड वितरीत करण्यात आली. याशिवाय,उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींसंदर्भात  हजारो लोकांची तपासणी करण्यात आली;

आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये (AB-HWCs)16 एप्रिल 2022 रोजी,एका दिवसात ई-संजीवनी मंचावरून   3 लाख लोकांना दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला देण्याचा विक्रम रचला गेला.  आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांवरून वैद्यकीय सल्ल्यासाठी एकाच दिवसात, दिली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे. एकाच दिवशी  1.8 लाख लोकांना सल्ला दिला गेल्याचा पूर्वीचा विक्रम यामुळे मागे पडला आहे. 19 एप्रिल 2022 रोजी, देशभरात  25,000 अधिक लोकांना दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला गेला.

19.04.2022 चा राज्यनिहाय तालुका आरोग्य मेळा अहवाल पुढीलप्रमाणे आहे:

 

 

 

S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1818413) Visitor Counter : 193