आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 186 कोटी 54 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 43 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 11,542

गेल्या 24 तासांत देशात 2,183 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.32% आहे

Posted On: 18 APR 2022 9:50AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 एप्रिल 2022

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 186 कोटी 54 लाखांचा (1,86,54,94,355) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,27,52,392 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

 

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. आतापर्यंत 2 कोटी 43 लाखांहून अधिक (2,43,55,282) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत नागरिकांना खबरदारीच्या 1,62,532 मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404362

2nd Dose

10008336

Precaution Dose

4600509

FLWs

1st Dose

18414332

2nd Dose

17526051

Precaution Dose

7142520

Age Group 12-14 years

1st Dose

24355282

2nd Dose

171544

Age Group 15-18 years

1st Dose

57887693

2nd Dose

40464152

Age Group 18-44 years

1st Dose

555263343

2nd Dose

472819549

Precaution Dose

37140

Age Group 45-59 years

1st Dose

202851927

2nd Dose

186818486

Precaution Dose

125392

Over 60 years

1st Dose

126814564

2nd Dose

116368094

Precaution Dose

13421079

Precaution Dose

2,53,26,640

Total

1,86,54,94,355

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 11,542 इतकी झाली आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.




परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,985 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,25,10,773 झाली आहे.

 


गेल्या 24 तासांत, देशात नव्या 2,183 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,61,440 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 83 कोटी 21 लाखांहून अधिक (83,21,04,846) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.32% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.83%.इतका नोंदला गेला आहे.

 



 

****

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817681) Visitor Counter : 260