अल्पसंख्यांक मंत्रालय
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित 40व्या 'हुनर हाट' चे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले उद्घाटन
हुनर हाटसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत साकार करण्याला बळकटी मिळत आहे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन
उस्ताद योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण घेऊन युवकांनी नोकरी मागणारी नव्हे तर नोकरी देणारी व्यक्ती व्हावे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
हुनर हाट ला भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे आवाहन
Posted On:
17 APR 2022 3:21PM by PIB Mumbai
मुंबई दि. 17 एप्रिल,2022
हुनर हाटसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत साकार करण्याला बळकटी मिळत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. देशाच्या प्रत्येक भागातील 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल' च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणाऱ्या हुनर हाट ची 40वी आवृत्ती 16 ते 27 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे. या 'हुनर हाट' चे औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, , त्यावेळी ते बोलत होते .
या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1,000 विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे, असे ठाकूर म्हणाले.यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस पी सिंह टेवटिया व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ठाकूर पुढे म्हणाले 2016 मध्ये सुरु झालेल्या या उपक्रमात विविध राज्यातील उत्पादनांची माहिती घेऊन याबद्दलची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे श्रेय मोदीजींना जाते असे ठाकूर यांनी सांगितले.
स्किल इंडिया उपक्रमाअंतर्गत नक्वी यांच्या मंत्रालयातर्फे उस्ताद योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम होत आहे ,याचा युवकांनी लाभ घेत नोकरी मागणारे न होता नोकरी देणारी व्यक्ती व्हावे असे ठाकूर म्हणाले.
या उपक्रमातून 9 लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे कार्य अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे असे सांगत ठाकूर म्हणाले कि या उपक्रमाच्या संचालनात कोणत्याही कलाकाराला स्थलांतरित व्हावे लागले नाही हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.तसेच कारागिरांना स्वतःच्या गावातच राहून स्वतःचे उत्पन्न दुप्पट चौपट करण्याची संधी देण्याचे कार्य माध्यमातून नक्वी यांनी केले आहे.
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या उपक्रमाअंतर्गत टाळेबंदीच्या काळात देखील मोदी यांच्या संकटात संधी शोधण्याच्या आदेशानुसार कारागिरांनी स्वतःच्या गावालाच नव्हे तर जिल्ह्याला स्थानिक कलेवर आधारित उत्पादने निर्माण केली असे ठाकूर म्हणाले.
दुबई आणि बहुतेक आखाती देशांमध्ये आज सर्वात जास्त संख्येने कुशल भारतीय लोक कार्यरत आहेत असे निरीक्षण नोंदवून ठाकूर म्हणाले कि तेजस उपक्रमाअंतर्गत येत्या एका वर्षाच्या आत 30 हजार भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण देऊन दुबईमध्ये पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात उपस्थित कारागीर बंधू भगिनींना ठाकूर यांनी सांगितले की, आज घडीला ओटीटी मंचाचा प्रभाव आणि कक्षा इतकी मोठी आहे की, त्यावर तुम्ही तुमच्या उत्पादनांचे सादरीकरण केले तर संपूर्ण देशातच काय पण जगभरात तुमच्या उत्पादनांची माहिती पोहोचुन विक्री हि वाढेल यासाठी कोणत्याही निर्यात कंपनीची गरज भासणार नाही असे ते म्हणाले .
हुनर हाट म्हणजे भारतीय कला, संस्कृती आणि कौशल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीचा एक आदर्श मंच आहे. यामध्ये तीन व्ही म्हणजेच विश्वकर्म्याच्या वारशाचा विकास एका समर्थ आणि विकसित मंचाच्या माध्यमातून झाला आहे. सरकारने या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ कला आणि वारसा यांचेच जतन केले आहे असे नाही तर स्वदेशी उत्पादनांना नवे बाजार आणि नव्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत असे ठाकूर यांनी सांगितले.
संपूर्ण देशातील कारागीर त्यांची कौशल्ये घेऊन मुंबईत आले आहेत, तेव्हा मुंबईच्या जनतेने याची भरपूर खरेदी करून या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ठाकूर यांनी केले.
हुनर हाट ला भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि राज्यसभेचे उपनेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले .या ठिकाणी सादर करण्यात आलेली उत्पादने पाहून आपल्या देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध कलाकारांच्या कौशल्यांचा अंदाज येईल असे त्यांनी सांगितले .हुनर हाट या उपक्रमातील सहभागींची निवड करताना कोणताही धर्म अथवा प्रांत अशा मर्यादेत केली नाही असे नक्वी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे देशाच्या एका कोपऱ्यातील गावात तयार होणारी वस्तू जगभरात पोहोचते आणि तिची विक्री होते. तुम्ही सर्वांनीच अशा तंत्रज्ञानाच्या मंचाचा वापर करायला हवा. गेल्या आठ वर्षांमध्ये संघटीत आणि असंघातिक क्षेत्रांमध्ये 15 कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले हे लक्षात घ्यायला हवे.रोजगार म्हणजे स्वाभिमानाने, मेहनतीने काम करणे असे ते म्हणाले.
हुनर हाट हा आता आत्मनिर्भर भारत आणि लोकल फॉर व्होकल चा ब्रँड ठरला आहे असे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस पी सिंह टेवटिया यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
हुनर हाट' ला भेट का द्यावी
'हुनर हाट' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'स्वदेशीतून स्वावलंबन' या संकल्पनांचा सशक्त, यशस्वी प्रकल्प आहे. या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1,000 विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत. ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे. मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपुर, बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मिळ उत्पादने घेऊन आले आहेत.
‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण
देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय ‘हुनर हाट’ मधील फूड कोर्टच्या माध्यमातून केलं आहे. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
12 दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत - संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. अन्नू कपूर, पंकज उधास, सुदेश भोसले, सुरेश वाडेकर, साधना सरगम, अमित कुमार, शैलेन्द्र सिंह, शब्बीर कुमार, महालक्ष्मी अय्यर, भूमि त्रिवेदी, कविता पौडवाल, दलेर मेहदी, अल्ताफ राजा, रेखा राज, उपासना सिंह (हास्य कलाकार), एहसान कुरैशी (हास्य कलाकार), भूपिंदर सिंह भुप्पी, रानी इन्द्राणी, मोहित खन्ना, प्रिया मलिक, व्हीआयपी हास्यकलाकार, जॉली मुखर्जी, प्रियंका मैत्रा, विवेक मिश्रा, दीपक राजा (हास्य कलाकार), अदिति खांडेगल, अंकिता पाठक, सिद्धांत भोसले, राहुल जोशी, सुप्रिया जोशी, भूमिका मलिक, प्रेम भाटिया, पोश जेम्स आदि कलाकार आपले कार्यक्रम करणार आहेत.
***
Jaydevi PS/S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817559)
Visitor Counter : 385