पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 च्या संकटकाळात तसेच युक्रेनच्या आपत्तीमध्ये बीएपीएस संस्थेने केलेल्या मदतकार्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
16 APR 2022 6:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्येष्ठ बीएपीएस साधू ईश्वरचरण स्वामी आणि ब्रह्मविहारी स्वामी यांची भेट घेतली आणि कोविड-19 च्या संकटकाळात तसेच युक्रेनच्या आपत्तीमध्ये बीएपीएस संस्थेने केलेल्या मदतकार्याची प्रशंसा केली. मोदी यांनी परमपवित्र प्रमुख स्वामी महाराजजी यांच्या लवकरच येऊ घातलेल्या जन्मशताब्दीच्या सोहोळ्याविषयी चर्चा केली.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ज्येष्ठ बीएपीएस साधू ईश्वरचरण स्वामी आणि ब्रह्मविहारी स्वामी यांची आज भेट घेतली. त्यांच्याकडे कोविड-19 च्या संकटकाळात तसेच युक्रेनच्या आपत्तीमध्ये बीएपीएस संस्थेने केलेल्या मदतकार्याची प्रशंसा केली. तसेच परमपवित्र प्रमुख स्वामी महाराजजी यांच्या लवकरच येऊ घातलेल्या जन्मशताब्दीच्या सोहोळ्याविषयी चर्चा केली आणि समाजाप्रती त्यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण केले.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1817389)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada