आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 186.38 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.40 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,366

गेल्या 24 तासात 975 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.26%

Posted On: 16 APR 2022 2:19PM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.38 (1,86,38,31,723) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,26,92,477 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.40 (2,40,16,391) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 1,10,212 जणांना क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यात आली.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,04,316

2nd Dose

1,00,07,750

Precaution Dose

45,85,873

FLWs

1st Dose

1,84,14,253

2nd Dose

1,75,25,215

Precaution Dose

71,12,025

Age Group 12-14 years

1st Dose

2,40,16,391

2nd Dose

57,147

Age Group 15-18 years

1st Dose

5,78,45,181

2nd Dose

4,03,05,973

Age Group 18-44 years

1st Dose

55,52,21,431

2nd Dose

47,22,70,506

Precaution Dose

24,335

Age Group 45-59 years

1st Dose

20,28,45,688

2nd Dose

18,67,02,436

Precaution Dose

85,877

Over 60 years

1st Dose

12,68,10,089

2nd Dose

11,62,97,530

Precaution Dose

1,32,99,707

Precaution Dose

2,51,07,817

Total

1,86,38,31,723

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,366  इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 796 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,07,834 झाली आहे.

गेल्या 24 तासात 975 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,00,918 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.14 (83,14,78,288) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.26% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.32% आहे.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817280) Visitor Counter : 178