निती आयोग
राज्य उर्जा व हवामान निर्देशांकाच्या (SECI) पहिल्या फेरीचा प्रारंभ
Posted On:
11 APR 2022 1:46PM by PIB Mumbai
निती आयोगाने 11 एप्रिल 2022 रोजी राज्य उर्जा व हवामान निर्देशांकाच्या (SECI) पहिल्या फेरीचा प्रारंभ केला. निती आयोगाचे अध्यक्ष डॉ राजीव कुमार या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. राज्य उर्जा व हवामान निर्देशांक फेरी- 1 नुसार 6 मापदंडांनुसार राज्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यानुसार राज्यांची क्रमवारी ठरवली जाते. (1) DISCOM ची कामगिरी (2) उर्जेची उपलब्धता, किफायतशीरता आणि विश्वासार्हता (3) स्वच्छ उर्जा (4) उर्जा कार्यक्षमता (5) पर्यावरणदृष्टया अनुकूल (6) नवे उपक्रम हे सहा मापदंड आहेत . या मापदंडाची आणखी 27 निर्देशांकात विभागणी केली आहे. या संयुक्त राज्य उर्जा व हवामान निर्देशांक फेरी -1 मधील गुणांनुसार राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे तीन गटात विभाजन केले आहे -फ्रंट रनर्स , अचिव्हर्स, अस्पायरन्टस .
राज्य उर्जा व हवामान निर्देशांक (SECI) फेरी - 1 नुसार राज्यांची क्रमवारी खालील तक्त्यात दिली आहे.
Figure 1

Figure 2

Figure 3

***
S.Kane/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815646)