आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 185 कोटी 55 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 16 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील सध्याची सक्रीय कोविड रुग्णसंख्या 11,365

गेल्या 24 तासांत देशात 1,150 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे

Posted On: 09 APR 2022 9:25AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 185 कोटी 55 लाखांचा (1,85,55,07,496) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,24,25,493 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 2 कोटी 16 लाखांहून अधिक (2,16,92,183) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404033

2nd Dose

10004427

Precaution Dose

4524344

FLWs

1st Dose

18413844

2nd Dose

17519503

Precaution Dose

6995337

Age Group 12-14 years

1st Dose

21692183

Age Group 15-18 years

1st Dose

57594908

2nd Dose

39408907

Age Group 18-44 years

1st Dose

554993058

2nd Dose

469601217

Age Group 45-59 years

1st Dose

202811330

2nd Dose

186144719

Over 60 years

1st Dose

126785517

2nd Dose

115945060

Precaution Dose

12669109

Precaution Dose

2,41,88,790

Total

1,85,55,07,496

 

कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 11,365 झाली आहेदेशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002AXY5.jpg

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,194 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,25,01,196 झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003246O.jpg

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 1,150 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004OAEQ.jpg

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,66,362 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 79 कोटी 34 लाखांहून अधिक (79,34,29,395) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.25%.इतका नोंदला गेला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005J5X9.jpg

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815140) Visitor Counter : 198