आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 184.52 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 1.81 कोटींहून अधिक बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,445

गेल्या 24 तासात 1,260 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.23%

Posted On: 02 APR 2022 9:32AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.52  (1,84,52,44,856)  कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,20,93,346 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.24% आहे.

 

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.81 (1,81,21,823) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403737

2nd Dose

10000984

Precaution Dose

4474440

FLWs

1st Dose

18413339

2nd Dose

17512279

Precaution Dose

6897755

Age Group 12-14 years

1st Dose

18121823

Age Group 15-18 years

1st Dose

57268440

2nd Dose

38356896

Age Group 18-44 years

1st Dose

554683438

2nd Dose

466628426

Age Group 45-59 years

1st Dose

202760965

2nd Dose

185485333

Over 60 years

1st Dose

126746554

2nd Dose

115534690

Precaution Dose

11955757

Precaution Dose

2,33,27,952

Total

1,84,52,44,856

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 13,445 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर आता  98.76% झाला आहे.

 

गेल्या 24 तासांत 1,404 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,92,326 झाली आहे.

गेल्या 4 तासात 1,260 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 5,28,021  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.02  (79,02,98,979)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1812687) Visitor Counter : 206