राष्ट्रपती कार्यालय

चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेती चांद, नवरेह आणि साजिबू चेरोबा या सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 APR 2022 7:31PM by PIB Mumbai

 

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी चैत्र शुक्लादी, उगादी , गुढीपाडवा, चेती चांद, नवरेह  आणि साजिबू चेरोबा यांच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशामध्ये राष्ट्रपती म्हणाले, चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेती चांद, नवरेह आणि साजिबू चेरोबा या सणांच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो.

वसंत ऋतूसोबत  भारतीय नववर्षाचे स्वागत देशभरात विविध प्रकारे  करण्यासाठी साजरे केले जाणारे हे सण, आपल्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे नाते मजबूत करतात.हे आनंददायी सण आपल्या समाजात सौहार्द आणि बंधुत्वाची भावना अधिक वृद्धिंगत करतात.

प्रत्येकाच्या जीवनात हे सण प्रेम आणि सद्भावना वृद्धिंगत करतील आणि या नवीन वर्षात आपण सर्वजण मिळून नव्या उत्साहाने राष्ट्र उभारणीसाठी योगदान देऊ.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812516) Visitor Counter : 172