आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रदाता देयके आणि दर निश्चिती सल्लामसलत प्रपत्रावर सूचना मागवल्या आहेत
Posted On:
01 APR 2022 5:35AM by PIB Mumbai
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत (एबी पीएम -जेएवाय) प्रदाता देयके आणि दर निश्चिती सल्लामसलत प्रपत्र जारी केले आहे.
या सल्लामसलत प्रपत्त्रामध्ये जगभरातील विविध विमा योजनांमध्ये वापरल्या जाणार्या प्रदाता देयक यंत्रणेचा आढावा घेतला आहे. याशिवाय प्रदात्यांना त्यांच्या देयकांचा कसा परतावा दिला जातो याचे तपशीलवार माहिती देखील या प्रपत्रात दिली आहे.
दुसरे म्हणजे, पीएमजेएवाय अंतर्गत रुग्णालयांच्या दरनिश्चितीसाठी खर्चाच्या पुराव्याच्या वापराबाबत प्रपत्र चर्चा करते. रुग्णालयाच्या विविध वैशिष्ट्यांनुसार आरोग्यसेवा पुरवण्याच्या खर्चातील वैविध्याचे हे प्रपत्र विश्लेषण सादर करते आणि रुग्णालयांना वेगवेगळया प्रकरणांवर आधारित देयके निर्धारित करण्यासाठी चौकटीची चर्चाही हे प्रपत्र करते.
तिसरे म्हणजे, रुग्णाच्या वैशिष्ट्यांनुसार गंभीरता-तीव्रता आणि सहव्याधीच्या पातळीवर आधारित खर्चाचे निर्धारण करण्यासाठी निदान-संबंधित गटाच्या (डीआरजी) सिम्युलेशन पथदर्शी प्रस्ताव पाच राज्यांमधे लागू करण्याचे एनएचएचे उद्दीष्ट हे प्रपत्र करते..
चौथे, आरोग्य लाभ निधी आणि त्याच्या किंमतींमध्ये नवीन हस्तक्षेप समाविष्ट करण्यावरील निर्णयांसाठी आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाच्या (एचटीए) वापराच्या आराखड्याचे वर्णन, प्रपत्रात केले आहे. शेवटी, महागाईचा विचार करता दरसाल सतत दर अद्यायावत करण्याचा दृष्टिकोनही यात मांडला आहे.
या सल्लामसलत प्रपत्राद्वारे, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने प्रदात्याच्या देयक पद्धतींशी संबंधित विविध मुद्दे, दराकडे पाहण्याचा दृष्टीकोन, दर ठरवण्याची पद्धत, डीआरजी आधारित प्रदाता देयके निश्चित करण्यासाठी खर्चाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्तावित दृष्टिकोन, प्रस्तावित एचटीए- मूल्याधारीत दर प्रणाली, आणि महागाई समायोजनासाठी वार्षिक दर पुनर्गणना याबाबत भागधारकांचा अभिप्राय मागविले आहेत .
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी या सल्लामसलत प्रपत्रावर आपले विचार मांडले. ते यावेळी म्हणाले, “आम्ही आरोग्य लाभ निधी अंतर्गत विविध प्रक्रियांसाठी दर निश्चितीची प्रमाणित पद्धत विकसित करत आहोत. पीएमजेएवायसाठी हे दस्तऐवज प्रमाणित आणि पारदर्शक दरधोरण विकसित करण्यात मदत करतील. यामुळे भारतीय आरोग्य सेवा परिसंस्थेमध्ये कार्यक्षमता, स्वीकार्यता, गुणवत्ता आणि शाश्वतता सुनिश्चित होऊ शकेल. म्हणून, मी सर्व भागधारकांना विनंती करतो की त्यांनी या प्रपत्राचा अभ्यास करावा आणि त्यांचा मौल्यवान अभिप्राय द्यावा.”
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या क्षेत्रातील धुरीणांसोबत चर्चेचा थेट मंच प्रदान करण्यासाठी दर सल्लामसलत प्रपत्रावर सार्वजनिक वेबिनार देखील आयोजितकरण्याचे ठरवले आहे . त्याच्या लिंक पीएमजेएवाय संकेतस्थळावर सामायिक केल्या जातील.
सल्लामसलत प्रपत्राचा संपूर्ण मजकूर पीएमजेएवायच्या संकेतस्थळावर प्रकाशन विभागांतर्गत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे (हायपरलिंक: https://pmjay.gov.in/sites/default/files/2022-03/AB%20PM-JAY%20Price%20Consultation%20Paper_25.03.2022.pdf). सल्लामसलत प्रपत्रासंबंधीची मते आणि अभिप्राय hpqa.pricing@nha.gov.in वर ईमेल केले जाऊ शकतात. येत्या काही महिन्यांत संबंधित मुद्द्यांवर पुढील सल्लामसलत प्रपत्रे प्रसिद्ध केली जातील.
***
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812399)
Visitor Counter : 240