संरक्षण मंत्रालय
2022 वर्षातील पद्म पुरस्कार विजेत्यांच्या दुसऱ्या तुकडीने राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली; भारताच्या शहीद वीरांना वाहिली आदरांजली
पुरस्कार विजेत्यांनी नागरिकांना, विशेषत: युवकांना युद्ध स्मारकाला भेट देण्याचे आणि सशस्त्र दलांच्या पराक्रमाबद्दल जाणून घेण्याचे केले आवाहन
Posted On:
29 MAR 2022 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2022
2022 वर्षातील पद्म पुरस्कार विजेत्यांच्या दुसऱ्या तुकडीने 29 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. राष्ट्रपती भवनात 28 मार्च रोजी झालेल्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 2022 वर्षासाठी दोन पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 54 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त प्रभा अत्रे यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. पद्मश्री पुरस्कार विजेते पोलंडचे प्राध्यापक डॉक्टर मारिया बायरसकी, थायलंडचे डॉक्टर चिरपत प्रपंडविय, श्रीमती बसंती देवी धनेश्वर एंगती, गुरु तुलकु रिंपोचे, डॉक्टर प्राध्यापक हर मोहिंदर सिंग बेदी, सद्गुरू ब्रम्हेश आनंद आचार्य स्वामी जी आणि अब्दुल खदार इमाम साब नदाकटीन हे देखील उपस्थित होते.
पुरस्कार विजेते राष्ट्रीय युद्ध स्मारक परिसरात पोहचल्यावर त्यांना तेथील सेवा कर्मचार्यांनी सशस्त्र दलाच्या शौर्याबद्दल माहिती दिली. पुरस्कार विजेत्यांनी या भेटीच्या आयोजनाबाबत सरकारने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. ते म्हणाले की हे स्मारक देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि सैनिकांचे बलिदान या मूल्यांची अनुभूती देते. त्यांनी लोकांना, विशेषत: तरुणांना या स्मारकाला भेट देण्याचे आणि सैनिकांच्या शौर्यगाथा जाणून घेण्याचे आवाहन केले.
"येथे येऊन आपल्या सैनिकांना आदरांजली वाहणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान होता. आम्हाला त्यांचा खरोखर अभिमान वाटतो कारण ते आपले रक्षण करत आहेत आणि आपल्या देशाला पुढे नेत आहेत,” असे प्रख्यात शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या.
पद्मभूषण विजेते देवेंद्र झाझरिया आणि श्री सच्चिदानंद स्वामी आणि पद्मश्री विजेते सरदार जगजीत सिंग दर्दी, श्री काजी सिंग आणि पंडित राम दयाळ शर्मा यांच्यासह 2022 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या पहिल्या तुकडीने 22 मार्च 2022 रोजी या प्रतिष्ठित स्मारकाला भेट दिली होती.

In a first, Padma awardees 2022 visit National War Memorial, New Delhi
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810957)
Visitor Counter : 311