पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अहिंसा यात्रा संपन्नता समारोह कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित


‘वसुधैव कुटुंबकम’ परंपरेचा विस्तार केल्याबद्दल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मंत्राचा अध्यात्मिक प्रतिज्ञा म्हणून प्रसार केल्याबद्दल तेरापंथची केली प्रशंसा

"कोणत्याही प्रकारचे  व्यसन नसतानाच स्वत्वाची खरी जाणीव शक्य आहे"

“सरकारच्या माध्यमातून सर्व काही करण्याची भारताची प्रवृत्ती कधीच नव्हती; इथे सरकार, समाज आणि अध्यात्मिक विद्वानांची  नेहमीच समान भूमिका होती”

Posted On: 27 MAR 2022 6:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या  संदेशाद्वारे, श्वेतांबर तेरापंथच्या अहिंसा यात्रा संपन्‍नता समारोह  कार्यक्रमाला संबोधित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, पंतप्रधानांनी भारतीय संतांच्या हजारो वर्ष अखंड सुरु असलेल्या  परंपरेची आठवण करून दिली. श्वेतांबर तेरापंथाने आळसपणाचा त्याग करून आध्यात्मिक प्रतिज्ञा केली असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. तीन देशांत 18 हजार किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आचार्य महाश्रमणजींचे अभिनंदन केले. वसुधैव कुटुंबकमया परंपरेचा विस्तार केल्याबद्दल आणि एक भारत श्रेष्ठ भारतया मंत्राचा अध्यात्मिक प्रतिज्ञा म्हणून प्रचार केल्याबद्दल पंतप्रधानांनी आचार्य यांची प्रशंसा केली.  पंतप्रधानांनी श्वेतांबर तेरापंथ यांच्याशी असलेल्या त्यांच्या दीर्घ स्नेहाचे  स्मरण केले. आणि त्यांना त्यांच्या  पूर्वीच्या विधानाची  आठवण झाली की,   हा  तेरा पंथ आहे , हा माझा  पंथ है’ – हा तेरापंथ माझा मार्ग आहे.

2014 मध्ये लाल किल्ल्यावरून रवाना झालेल्या 'पदयात्रे'चे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.आणि एक योगायोग नमूद केला की, त्यांनी स्वतः त्याच वर्षी भारताचे पंतप्रधान म्हणून आपला नवीन प्रवास सुरू केला आणि लोक सेवा आणि लोककल्याणाच्या प्रवासाला सुरुवात केली. पदयात्रेच्या सौहार्द , नैतिकता आणि व्यसनमुक्ती या विषयांवरील संकल्पनेची त्यांनी प्रशंसा केली. कोणत्याही प्रकारचे व्यसन नसतानाच स्वत्वाची खरी जाणीव शक्य आहे, असे ते म्हणाले.  व्यसनापासून मुक्तता स्वतःमध्ये विलीन होण्यास कारणीभूत ठरते यातून  विश्वासह सर्वांचे कल्याण होते, असे त्यांनी सांगितले.

आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाज आणि  देशाप्रती कर्तव्य बजावण्याचे आवाहन देश करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या भावनेने देशाची वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. .  सरकार सर्व काही करेल अशी  भारताची प्रवृत्ती  कधीच नव्हती आणि येथे सरकार, समाज आणि अध्यात्मिक विद्वानांनी नेहमीच समान भूमिका बजावली आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. वचनपूर्तीच्या दिशेने कर्तव्याच्या मार्गावर चालत असताना,देश ही भावना प्रतिबिंबित करत आहेअसे ते म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी  देशाला पुढे नेण्याचे प्रयत्न आणि प्रतिज्ञा कायम ठेवण्याचे  आवाहन अध्यात्मिक नेत्यांना  केले.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1810260) Visitor Counter : 235