कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सीजीएचएस सुविधेअंतर्गत बाह्य रुग्ण सेवा मिळविण्यासाठी अथवा ठराविक आरोग्य भत्ता यापैकी निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला पर्याय बदलासाठीची प्रक्रिया आणि कालमर्यादा यासंदर्भात केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने जारी केल्या सूचना

Posted On: 24 MAR 2022 11:46AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 24 मार्च 2022


सध्या लागू असलेल्या सूचनांनुसार सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या कक्षेबाहेरील क्षेत्रात राहणाऱ्या  निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकाला सीजीएचएस अंतर्गत मिळणाऱ्या बाह्य रुग्ण सेवा सुविधेऐवजी मासिक 1000 रुपये एफएमए अर्थात ठराविक आरोग्य भत्ता घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक त्यांच्या जीवित कालावधीत एकदा एफएमए ऐवजी सीजीएचएस अंतर्गत मिळणाऱ्या बाह्य रुग्ण सेवा सुविधेचा पर्याय किंवा या उलट क्रियेचा पर्याय निवडू शकतात. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अखत्यारीतील निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने आता निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकाला सीजीएचएस अंतर्गत मिळणारी बाह्य रुग्ण सेवा सुविधा किंवा एफएमए  यामध्ये  पर्याय बदलासाठीची प्रक्रिया आणि कालमर्यादा यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत.
 
नव्याने जारी केलेल्या सूचनांनुसार, जर एफएमए सुविधेचा लाभ घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला सीजीएचएस अंतर्गत मिळणाऱ्या बाह्य रुग्ण सेवा सुविधेचा लाभ घायचा असेल तर तो किंवा ती एफएमए सुविधा बंद करण्यासाठी ज्या संबंधित बँकेकडून निवृत्तीवेतन वितरीत होते त्या बँकेकडे अर्ज करू शकतो/शकते. संबंधित बँक एफएमए सुविधेअंतर्गत रक्कम देणे थांबवेल आणि यासंदर्भातील अर्ज मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या तीन  दिवसांच्या आत तसे प्रमाणपत्र जारी करेल. त्यानंतर, निवृत्तीवेतनधारक आवश्यक सीजीएचएस योगदान भरल्यानंतर (आधी भरले नसल्यास) संबंधित सीजीएचएस अधिकाऱ्यांकडे सीजीएचएस कार्ड मिळण्यासाठी अर्ज करू शकतो/शकते. निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने सर्व संबंधित औपचारिकता पूर्ण केल्याच्या आणि सीजीएचएस योगदानाची रक्कम भरल्याच्या तारखेनंतर  कार्यालयीन कामाच्या चार दिवसांच्या आत त्याला/तिला तात्पुरते सीजीएचएस कार्ड जारी करण्यात येईल. नियमित सीजीएचएस कार्ड मिळेपर्यंत हे तात्पुरते कार्ड वापरता येईल.
 
जर सीजीएचएस  अथवा आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण अशा दोन्ही सुविधांचा लाभ घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला सीजीएचएसच्या कक्षेबाहेरील भागात रहात असताना किंवा निवासस्थान बदलल्यामुळे आधी सीजीएचएस कक्षेच्या आत असलेले निवासस्थान सोडून सीजीएचएस कक्षेबाहेरील भागात राहायला जाण्यामुळे जर एफएमए सुविधेचा पर्याय हवा असेल तर त्याला/तिला सीजीएचएस अंतर्गत मिळणारी बाह्य रुग्ण सेवा रद्द करण्यासाठी  सीजीएचएसच्या आधिकारिक संस्थेकडे अर्ज करावा लागेल. सीजीएचएसची आधिकारिक संस्था सीजीएचएस कार्डावर तशी नोंद करेल आणि अर्ज मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या चार दिवसांच्या आत हा/ही निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक बाह्य रुग्ण सुविधा घेणार नाही अशा अर्थाचे प्रमाणपत्र जारी करेल. त्यानंतर निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक एफएमएची रक्कम मिळणे सुरु करण्यासाठी सुधारित निवृत्तीवेतन मिळण्याची सुविधा सुरु होण्यासाठीच्या अर्जासह या प्रमाणपत्राची एक प्रत कार्यालय प्रमुखाकडे जमा करेल. अशा प्रकरणांमध्ये  सीजीएचएसची आधिकारिक संस्थेकडून प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून एफएमएची रक्कम देण्यात येईल.

***

ST/SC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809108) Visitor Counter : 215