प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. के विजय राघवन आणि आयआयटी, मद्रासचे संचालक प्रो. व्ही. कामकोटी यांच्या हस्ते एक्वामॅप जलव्यवस्थापन आणि धोरण केंद्राचे उद्घाटन
Posted On:
21 MAR 2022 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांच्या हस्ते 19 मार्च 2022 रोजी आयआयटी मद्रास येथील नवीन जलव्यवस्थापन आणि धोरण केंद्र म्हणजेच एक्वामॅपचे उद्घाटन झाले तसेच त्यांच्या https://aquamap.iitm.ac.in/ या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.
आयआयटी मद्रास चे संचालक व्ही. कामकोटी एक्वामॅप मधील अध्यापक सहाय्यक लिगी फिलिप आणि थीम वर्क अनालिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी बालसुब्रमण्यम तसेच इतिहास संशोधन आणि डिजिटल या संस्थेचे व भारतीय तंत्र शिक्षण संस्था, मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कृष्णन नारायणन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
एक्वामॅप या संस्थेच्या स्थापनेबद्दल बोलताना विजय राघवन यांनी हवामान बदल आणि त्यामुळे जैवविविधतेवर आलेले ओझे जग अनुभवत आहे , असे नमूद केले. "त्यामुळेच आपली हवा, पाणी, जमीन यांचे पुनर्जीवीकरण आणि शाश्वत विकासावर भर याला जास्त महत्व आले आहे", असे व्ही. कामकोटि यांनी सांगितले. " पाण्यासंबंधित आपल्या सर्व गरजांची तुलना करता शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गरज सर्वाधिक आहे म्हणूनच शेतीसाठी वापर होत असलेल्या पाण्याचा पुरेपूर आणि योग्य उपयोग करता यावा हेच एक्वामॅपच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट असेल. योग्य आणि कमाल पाणी व्यवस्थापन पद्धतीच्या वापरान्वये पाण्यासंबंधीच्या गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रश्नांवर उपाययोजना सुचवणे त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पाणी व्यवस्थापनाच्या सर्वोत्कृष्ट पद्धतीचे लाभदायक मॉडेल देशभरात विविध ठिकाणी राबवणे हे एक्वामॅपच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे." असेही त्यांनी नमूद केले.
एक्वामॅप हे राष्ट्रीय जल केंद्र असून पाणी सुरक्षा व शाश्वत शेती यासाठी डेटा विज्ञानाचा वापर अशा भव्य संकल्पनेवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था, मद्रास आणि भारतीय तंत्र शिक्षण संस्था, धारवाड संयुक्तपणे काम करत आहेत.
एक्वामॅपचे मुख्य कार्य खालील प्रमाणे आहे.
1. गाव तसेच शहरात पाणी वाटपाचे तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या पद्धती जमिनीवर राबवणे.
2. पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापनाशी संबंधित आव्हाने ओळखणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे.
3. अत्याधुनिक जल माहिती प्रयोगशाळेची स्थापना
प्रोफेसर लिगी फिलीप यांनी केंद्राच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या पहिल्या तीन प्रकल्पांबद्दल माहिती देताना सांगितले की "आमच्याकडे रसायनशास्त्र, बांधकाम, रासायनिक आणि मानव्य शाखा असे बहुशाखीय अध्यापक एक्वामॅपमध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी उपलब्ध आहेत. आमच्या प्रशासकीय आणि सल्लागार समितीत उत्कृष्ट जलतज्ञ आहेत."
1. स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गावांसाठी पाणी आणि मृदा स्तर चाचणी व ग्रामीण भागातील पर्यावरणीय व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यांचे डिजिटल प्रारुप निर्माण करणे
2. स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गावांसाठी कचरा व्यवस्थापन.
3. स्वयंचलित ग्रामीण पाणी पुरवठा योजनां निर्माण करणे
"या संस्थेत मिळवलेले ज्ञान देशासाठी वापरण्याची संधी दिल्याबद्दल मी आणि कृष्णन भारतीय तंत्र शिक्षण संस्था, मद्रास यांचे आभारी आहोत." असे बालसुब्रमण्यम म्हणाले.
या आगळ्यावेगळ्या माजी विद्यार्थी संस्थेशी संबंधित असलेल्या प्रारुपातून केंद्राला आमच्या माजी विद्यार्थ्यांची पाणी प्रश्ना संदर्भातील आवड आणि तयारी दिसून येईल असेही त्यांनी नमूद केले
एक्वामॅपचे संकेतस्थळ : https://aquamap.iitm.ac.in/
एक्वामॅपचे सभासद आणि सल्लागार समिती सदस्य: https://dev-aquamap.pantheonsite.io/management/
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807828)
Visitor Counter : 262