नागरी उड्डाण मंत्रालय
1 फेब्रुवारी ते 11 मार्च 2022 पर्यंत सुमारे 22,500 भारतीय युक्रेनमधून भारतात परतले
ऑपरेशन गंगा अंतर्गत 90 मदत उड्डाणांचे परिचालन करण्यात आले
ऑपरेशन गंगा अंतर्गत प्रवाशांचा विमानांच्या तिकीटाचा खर्च संपूर्णपणे केंद्र सरकारने केला
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2022 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
दिनांक 1 फेब्रुवारी ते 11 मार्च 2022 पर्यंत सुमारे 22,500 भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात परतले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत 90 मदत उड्डाणे चालवण्यात आली होती ज्यात भारतीय हवाई दलाच्या 14 उड्डाणांचा समावेश होता.
मदत उड्डाणे चालवण्यासाठी सरकारने भारतीय हवाई कंपन्यांशी समन्वय साधला होता. ऑपरेशन गंगा अंतर्गत एअर एशिया, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, गो फर्स्ट, इंडिगो आणि स्पाइसजेट या सहा खासगी विमान कंपन्यांनी चार्टर्ड सेवा चालवल्या.
युक्रेनला लागून असलेल्या रुमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकिया देशांतील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एअर एशिया, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, गो फर्स्ट, इंडिगो आणि स्पाइसजेट या सहा खासगी विमान कंपन्यांशी समन्वय साधला होता.
ऑपरेशन गंगा अंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने मिळून 23 मदत उड्डाणे चालवली आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत चालवल्या जाणार्या सर्व उड्डाणांसाठीचे हवाई भाडे संपूर्णपणे सरकारने भरले आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1807758)
आगंतुक पटल : 310