PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 17 MAR 2022 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 17 मार्च 2022

  • 180.80 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 30,799
  • Active cases stand at 0.07%
  • Recovery Rate currently at 98.73%
  • 4,491 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,24,54,546
  • 2,539 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.35%)
  • Weekly Positivity Rate (0.42%)
  • 78.12 cr Total Tests conducted so far; 7,17,330 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

राष्ट्रव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत लसीच्या आतापर्यंत 180.80 कोटीपेक्षा जास्त (1,80,80,24,147) मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2,12,61,666 सत्राद्वारे हे लसीकरण करण्यात आले आहे.

12-14 वर्षे वयोगटातल्या किशोरांसाठी 16 मार्च 2022 ला लसीकरण सुरु झाले. गेल्या 24 तासात 3 लाखाहून अधिक (3,00,405) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येचा घटता कल कायम राखत या  लसंख्येत आणखी घट होऊन ती आज 30,799  झाली आहे. देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या ती 0.07% आहे.

परिणामी रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 98.73% झाला आहे. गेल्या 24 तासात 4,491 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,54,546 झाली आहे.

गेल्या 24 तासात देशात 2,539 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात 7,17,330 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78.12  कोटीहून अधिक (78,12,24,304) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.42% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.35% आहे. इतर अपडेट्स :

 

S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806984) अभ्यागत कक्ष : 209