आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 180.80 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या.


12-14 वयोगटातल्या किशोरांना गेल्या 24 तासात लसीच्या 3 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

भारताच्या उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,799 पर्यंत घट; देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या ती 0.07%

गेल्या 24 तासात देशात 2,539 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.73%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.42%

Posted On: 17 MAR 2022 9:46AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत लसीच्या आतापर्यंत 180.80 कोटीपेक्षा जास्त (1,80,80,24,147) मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2,12,61,666 सत्राद्वारे हे लसीकरण करण्यात आले आहे.

12-14 वर्षे वयोगटातल्या किशोरांसाठी 16 मार्च 2022 ला लसीकरण सुरु झाले. गेल्या 24 तासात 3 लाखाहून अधिक (3,00,405) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,876

2nd Dose

99,88,133

Precaution Dose

43,40,771

FLWs

1st Dose

1,84,11,930

2nd Dose

1,74,84,152

Precaution Dose

66,23,571

Age Group 12-14 years

1st Dose

3,00,405

Age Group 15-18 years

1st Dose

5,61,03,820

2nd Dose

3,50,69,122

Age Group 18-44 years

1st Dose

55,36,41,508

2nd Dose

45,81,76,335

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,84,287

2nd Dose

18,34,33,562

Over 60 years

1st Dose

12,66,25,180

2nd Dose

11,42,49,464

Precaution Dose

1,05,89,031

Precaution Dose

2,15,53,373

Total

1,80,80,24,147

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

 

भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येचा घटता कल कायम राखत या  लसंख्येत आणखी घट होऊन ती आज 30,799  झाली आहे. देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या ती 0.07% आहे.

 

परिणामी रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 98.73% झाला आहे. गेल्या 24 तासात 4,491 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,54,546 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात देशात 2,539 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात 7,17,330 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78.12  कोटीहून अधिक (78,12,24,304) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.42% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.35% आहे.

***

ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806830) Visitor Counter : 204