राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींना पाच देशांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे सुपूर्द

Posted On: 16 MAR 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अल्जीरिया, रिपब्लिक ऑफ मालावी, कॅनडा, रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया आणि रशियन फेडरेशन या देशांच्या राजदूत वा उच्चायुक्तांकडून आज, 16 मार्च 2022 रोजी त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. राष्ट्रपतींना ज्यांनी आपली अधिकारपत्रे सुपूर्द केली त्यामध्ये

1. पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अल्जीरियाचे राजदूत  अँब्डेरहमानी बेंन्गुर्ह

2. रिपब्लिक ऑफ मालावीचे उच्चायुक्त लिओनार्द सेन्झा मेन्गाझी

3.  कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरान डीन मॅके

4. रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या राजदूत इना हॅग्नीन्गॅतॅज क्रिस्नमुर्ती

5. रशियन फेडरेशनचे राजदूत  देनिस इवाज्येविच एलिपोव्ह

अधिकारपत्रे स्वीकारानंतर राष्ट्रपतींनी या पाचही देशांच्या उच्चायुक्तांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. त्यांच्या नेमणुकीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या देशांबरोबर भारताचे चांगले तसेच मैत्रीपूर्ण व बहुआयामी संबध असल्याच्या बाबीवर भर दिला. यातील प्रत्येक देशासोबतचे द्विपक्षीय संबध दृढ करण्यात त्यांना यश मिळावे अशा कामनांसह त्यांच्या कुशलतेच्या तसेच प्रगती आणि समृद्धीच्या शुभेच्छाही  राष्ट्रपतींनी त्यांना दिल्या.

या उच्चायुक्तांच्या आणि राजदूतांच्या माध्यमातून राष्ट्रपतींनी त्यांच्या देशांच्या नेतृत्वालाही व्यक्तिगत स्तरावर शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजदूतांनी त्यांच्या  देशांचे भारतासोबतचे संबध दृढ करण्याच्या कामाप्रति असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806613) Visitor Counter : 246