भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) जनरली पार्टिसिपेशन्स नेदरलँड एन व्ही ला फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये समभाग अधिग्रहणास दिली मान्यता

Posted On: 16 MAR 2022 9:10AM by PIB Mumbai

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) जनरली पार्टिसिपेशन्स नेदरलँड एन व्ही कंपनीला फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये समभाग अधिग्रहणास मान्यता दिली आहे.

 

जनरली पार्टिसिपेशन्स नेदरलँड एन व्ही (जीपीएन / अधिग्रहणकर्ता) ही एस्सीक्यूरेझियोनी जनरली एसपीए (जनरली ग्रुप) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. जनरली ग्रुप ऑफ कंपन्यांची मूळ संस्था आहे. जनरली ग्रुप हा जागतिक विमा प्रदाता आहे आणि तो एफजीआयआयसीच्या माध्यमातून भारतातील सामान्य विमा उद्योगात कार्यरत आहे.

 

फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड  (एफजीआयआयसी/टारगेट) ही एक जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. भारतात नॉन-लाइफ किंवा सामान्य विमा सेवा क्षेत्रात ती कार्यरत आहे.

 

प्रस्तावित समायोजन जीपीएनद्वारे एफजीआयआयसीच्या समभागांच्या संपादनाशी संबंधित आहेत. जीपीएन या कंपनीची विद्यमान भागधारक आहे.
जीपीएनने फ्युचर एंटरप्रायझेस लिमिटेडकडे एफजीआयआयसीच्या भाग भांडवलाचा अंदाजे 25% हिस्सा संपादन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे एफजीआयआयसी मध्ये जीपीएन ची एकूण भागीदारी (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) 49 टक्क्यांवरुन सुमारे 74 टक्के इतकी वाढेल.  
यासंबंधी सीसीआयचा तपशीलवार आदेश लवकरच जारी केला जाईल.



***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806442) Visitor Counter : 252